ग्रामपंचायत हद्दीतील दोन चिंचेची झाडे व एका खासगी व्यक्तीच्या हद्दीतील तीन झाडे बुडापासून कापली गेली. अंजनगाव येथील आरामशीन व्यापाऱ्यांशी १७ हजार रुपयांत सौदा करून झाडांची कत्तल करण्यात आली. ती रवाना होण्याच्या अगोदरच ग्रामपंचायत कार्यालय व वनविभागाकडे सदर घटनेची तक्रार झाली.
विनापरवानगी तोडलेल्या झाडांचे पंचनामा करून संबंधितावर वनविभागाच्या कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करू, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी दिली. आम्ही वनविभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी केली.