शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

अंबानगरीत पायरेटेड सीडींची खुुलेआम विक्री

By admin | Published: September 19, 2016 12:19 AM

अंबानगरीत अनेक दिवसांपासून खुलेआम पायरेटड सीडीची विक्री सुरू आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : ३० रुपयांत मिळते नवीन चित्रपटांची सीडीसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत अनेक दिवसांपासून खुलेआम पायरेटड सीडीची विक्री सुरू आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून कुठलाही नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यास दुसऱ्याच दिवशी ग्राहकांना शहारात ती सीडी उपलब्ध होते. कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार चित्रपटाची या बनावट सीडी खुल्या बाजारात विकणे गुन्हा ठरते. परंतु काही तस्करही सीडी पायरेटेड करून लाखोंचा गौरखधंदा करीत आहे. येथील हॉटेल रामगिरीच्या समोर दीप सीडीचे दुकान आहे. येथे अशा प्रकाराच्या सीडीज विकत घेण्यासाठी नागरिकांची रीघ लागते. त्यामुळे याला आळा कोण घालणार, असा प्रश्न पडत आहे. मल्टिमीडियाचा जमाना असल्यामुळे क्षणात आता कुठलीही गोष्ट उपलब्ध होते. यू-ट्युबवर पाहिजे तो चित्रपट पहायला मिळतो. पण जोपर्यंत कुठल्याही नवीन चित्रपटाचा दिगदर्शक ही सीडी खुल्या बाजारात विकण्याची परवानगी देत नाही, तो पर्यंत कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार याला विक्री करता येत नाही. परंतु शहरात पोलिसांचे व सीडी विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे हा व्यवसाय फोफावला आहे. २० ते ३० रुपयांत घरबसल्या नागरिकांना सीडीवरून कुठलाही चित्रपट पाहता येत असल्यामुळे याचा परिणाम चित्रपटगृहाच्या ग्राहकांवरही झाला आहे. पायरेटेड सीडी शहरात खुलेआम विक्री होत असताना पोलिस गप्प का असा प्रश्नही समोर येत आहे. या सीडीच्या व्यवसायातून रोज शहरात लाखो रुपयांचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे अश्या सीडीज सेंटरवर कारवाई होणे अपेक्षित आहेत. बनावट सीडीचे मोठे रॅकेटबनावट सीडीज अमरावतीत मुंबईहून दाखल होत असल्याची महिती आहे. या सीडी विक्रीचे अमरावतीत मोठे रॅकेट असून, राजकमल चौक, रेल्वेस्टेश्न चौक गांधी चौक व शहरातील अनेक भागात या बनावट सीडी खुलेआम विक्री करण्यात येत आहे. कुठलाही नविन चित्रपट रीलीज झाला की अशा सीडीज सहज उपलब्ध होतात. ग्राहकही त्याला खरेदी करण्यासाठी पसंती दर्शवितात. बनावट सीडी विकणे गुन्हाकॉपीराईट अ‍ॅक्टनुसार पायरेटेड बनावट सीडीज विकणे गुन्हा आहे. पण या कायद्याची अंबानगरित सर्रास पायमल्ली केली जात आहे. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच या अवैध सीडीज अमरावतीत सर्रास विकल्या जातात. या सीडीजमध्ये ब्ल्यू फिल्मसच्या सीडीही विक्री करण्यात येत आहेत. हा प्रकार रोखणे गरजेचे आहे. 'टॉरेन्ट सॉफ्टेवेअर'ने केली जाते 'डाऊनलोडिंग'एखाद्या चित्रपटातील पहिल्याच 'शो'मधून अत्याधुनिक कॅमेऱ्याने चित्रपटाचे चित्रीकरण केले जाते. लगेच संगणकाच्या माध्यमातून 'टोरेन्ट सॉफ्टेअर'च्या माध्यमातून याच्या हजारो पायरेटेड सीडीज 'डाऊनलोटड' केल्या जातात व यातून कोट्यवधी रुपयांच्या गौरखधंदा राज्यभर सुरू असल्याचे चित्र आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात महिन्याकाठी या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. हा प्रकार बंद करवा व अशा सेंटरवर पोलिसांनी धाडी टाकावी, अशी मागणी होत आहे. पायरेटेड सीडीज खुल्या बाजारात विकणे हा कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार गुन्हा आहे. अश्या सीडीज विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू असते. चित्रपटाच्या दिगदर्शकांनी तक्रार दिल्यास याचा मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण ती त्याची प्रोपरटीज असते. - विशाल खलसेसहायक पोलीस निरीक्षक