शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आॅनलाईन प्रवेशासाठी लिंकच उघडेना !

By admin | Published: February 08, 2017 12:26 AM

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश आॅनलाईन पद्धतीने देण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

पालक त्रस्त : प्राथमिक शिक्षण प्रक्रियाअमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश आॅनलाईन पद्धतीने देण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. रविवारपासून आॅनलाईवर प्रवेश अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु आॅनलाईन प्रवेशाची माहिती भरण्यासाठी शिक्षण विभागाने दिलेली लिंकच उघडत नसल्यामुळे पालकांसमोर अडचण निर्माण होत आहे. लिंक उघडत नसल्याने पालक त्रस्त झाले आहेत. शिक्षण विभागाने पालकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.अनुसूचित जाती, जमाती आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग या वर्गवारीनुसार चालू वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना २५ टक्के प्रवेशासाठी शाळांची नोंदणी करण्याचे बजावण्यात आले. त्यासाठी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील पात्र शाळांपैकी काही शाळांनी नोंदणी केली आहे. उर्वरित शाळांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. ५ फेब्रुवारीपासून ते २१ फेब्रुवारीपर्यंत पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी आॅनलाईन माहिती भरण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आपल्या पाल्याला नामांकित आणि दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालक धडपड करीत आहेत. ५ फेब्रुवारीपासूनच पालकांनी शिक्षण विभागाने दिलेली 'एज्युकेशन महाराष्ट्र जीओजी.इन' या वेबसाईटवर जाऊन पाल्यांची प्रवेशासंबंधीची माहिती भरण्याचा जिकरीचे प्रयत्न करीत आहेत.परंतु लिंकच उघडत नसल्यामुळे पालकांची पंचाईत झाली आहे. त्रस्त झालेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडून ही लिंक सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)पालकांची नाराजीहल्ली कामाची व्यस्तता पाहता आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी वेळेतून वेळ काढून संकेतस्थळावर फॉर्म भरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र लिंक उघडत नसल्यामुळे त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यांची नाराजी आहे.