८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत रोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत रिक्त राहिलेल्या जागांसाठी व्यक्तिश: हजेरी नोंदवता येईल व त्याच दिवशी दुपारी १ वाजता हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित होईल. त्याच गुणवत्ता यादीनुसार उपलब्ध जागांचे उमेदवाराच्या मागणीनुसार वाटप (अलॉटमेंट) होईल अलॉटमेंट प्राप्त झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असेल. हीच प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत रोज राबविण्यात येईल. समुपदेशनासाठी व प्रवेशासाठी उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे यांनी केले आहे.
आयटीआयमध्ये पुन्हा एकदा प्रवेशाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:22 AM