सामान्य प्रशासन विभागाचे नवे गाईडलाईन, कोविड १९ च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अमरावती : कोविड- १९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन २०२१-२०२२ या चालू आर्थिक वर्षातील शासकीय कर्मचाऱ्यांना ३० जूनपर्यत बदल्या करता येईल, असे नवीन गाईडलाईन सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज सादर केले, त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रि व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. तथापि, कोविड -१९ च्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे मागील सन २०२०-२०२१या आर्थिक वर्षात सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणांमुळे करावयाच्या बदल्या ३१ जुुुलै २०२० पर्यत करण्याचे आदेश ७ जुलै २०२० च्या शासन निर्णयामुळे निर्गमित केले होते. मात्र, या बदली शासनादेशाला १० ऑगस्ट २०२० पर्यत वाढविण्यात आली. मात्र, आता २०२०-२०२१ हे आर्थिक वर्ष संपून सन २०२१-२०२२ हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यानुसार प्रशासकीय विभागांकडून सन २०२१-२०२२ या चालू आर्थिक वर्षात बदली अधिनियमानुसार बदल्या
करण्याची प्रक्रिया आरंभली आहे. यात सर्वसाधारण बदल्या, काही अपवादात्मक बदल्या किंवा विशेष कारणांच्या बदल्यांचा समावेश असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उप सचिव गीता कुलकर्णी यांनी शासनादेशाद्धारे स्पष्ट केले आहे.
----------------
या बदल्यांनाच असेल प्राधान्य
- सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे
- काेरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे
- शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची बदली करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटल्यास करावयाची बदली