शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकरी धोरणाविषयी विरोधी पक्ष असंवेदनशील, संजय धोत्रे यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 20:00 IST

या ऐतिहासिक कायद्यामुळे शेतकरी कायदेशीर बंधनातून मुक्त होतील. यापुढे केवळ मंडईतील ठरावीक व्यापाºयांनाच शेतमाल विकण्यास शेतकरी बांधील नाही.

अमरावती - शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने ऐतिहासिक विधेयक पारित केले. मात्र, शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष किंचितही संवेदनशील नसल्याची टीका केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केली. या कायद्यामुळे शेतक-यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची मुभा आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होईल व याद्वारे शेतकरी सक्षम होतील. किमान आधारभूत किंमत आणि सरकारी खरेदी त्याच ठिकाणी राहील. या कायद्याद्वारे शेतक-यांना त्यांची पिके साठवण आणि विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहणार असल्याचे ना. धोत्रे म्हणाले.

या ऐतिहासिक कायद्यामुळे शेतकरी कायदेशीर बंधनातून मुक्त होतील. यापुढे केवळ मंडईतील ठरावीक व्यापाºयांनाच शेतमाल विकण्यास शेतकरी बांधील नाही. याशिवाय सरकारी करापासूनही मुक्त होणार आहे. शेतकºयांना इतरही ठिकाणी शेतमाल विकण्याचे पर्याय देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यात आले आहे. आता शेतकºयांना शेतमाल राज्याच्या हद्दीत विकणे बंधनकारक असणार नाही. आता फायदेशीर किमतीवर विक्रीस उपलब्ध असलेल्या निवडीचा फायदा घेण्यास शेतकरी सक्षम असतील. देशात स्पर्धात्मक आणि डिजिटल व्यापार होईल, असे ना. धोत्रे म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची वचनपूर्ती केलेली आहे. शेतकरी किसान सन्मान योजना, एमएसपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, जनधन योजनेसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांद्वारे शेतकºयांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ना. धोत्रे म्हणाले. पत्रपरिषदेला महापौर चेतन गावंडे, आमदार प्रताप अडसड, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (दिघडे), माजी मंत्री अनिल बोंडे, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, जयंत डेहणकर, संध्या टिकले आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSanjay Dhoteसंजय धोटेPoliticsराजकारण