लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे.मोर्शी तालुक्यातील मायावाडी औद्योगिक वसाहतीमध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची इमारती उभी आहे. परंतु, ती केवळ एक शोभेची वास्तू म्हणून उभारून ठेवल्याचे चित्र आहे. या इमारतीत लाखो रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडलेली आहे. शासनाने हा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरूकेल्यास या प्रकल्पाचा फायदा निश्चितच या भागातील संत्रा उत्पादकांना होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर मोठे साखर कारखाने उभे करण्यात आले. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी कोठेही फिरावे लागत नाही. त्यामुळे त्यांच्या मालाला परिपूर्ण मोबदला मिळतो व नुकसानही होत नाही. त्याच्या उलट स्थिती संत्राउत्पादक शेतकºयांची आहे. येथे कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना संत्राफळे व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. व्यापारीसुद्धा परप्रांतात संत्र्याची निर्यात करतो. त्यामुळे बाजारपेठेसोबत शेतकऱ्यांचा कोणताही संबंध राहत नाही.संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू असते, तर शेतकऱ्यांना आपला माल स्वत: विकता आला असता आणि संपूर्ण मालाचे दाम शेतकºयांना मिळाले असते. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच येथील शेतकरीसुद्धा समाधानी राहिला असता. शासन वैदर्भीय शेतकºयांना सापत्न वागणूक देत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
संत्रा प्रक्रिया प्रकल्प गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:02 PM
वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे.
ठळक मुद्देबागायतदार हवालदिल : विक्री व्यवस्थापन आवश्यक