शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

वातावरण बदलाने संत्रा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:35 PM

परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.

ठळक मुद्देव्यापारी-दलालांच्या संगनमताने लूट : संत्रा उत्पादकांद्वारा स्वत:च बाजारपेठेत विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, धामणगाव गढी, मुरादपूर, धोतरखेडा, हनवतखेडा, परसापूर, टवलार, वागडोह, जनुना, रामापूर, कासमपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, सालेपूर, पांढरी, सावळी, गोंडवाघोली हा परिसर संत्र्याकरिता प्रसिद्ध आहे.मोठ्या खेड्यांच्या बसस्टँडवर व्यापारी-दलालांची एकच गर्दी असून, बस स्टँडच्या टपरीवर चहाच्या अर्ध्या कटिंगच्या भरवशावर ‘तुम्हारा माल वायवार है, माल पर जाली है, कॉफबंद है, मार्केट में किन्नू आया है, कोलारी (कोळशी) है, मार्केट में भाव गिरे है,’ अशी बतावणी करून संत्रा बागायतदारांची हिंमत खचवून लाखोंचा माल हजारात घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. एखादा बाहेरील तालुक्यातील व्यापारी बस स्टँडवर उतरला आणि दलालाकडे संत्राबागांची चौकशी केली असता, दलालाकडून त्या व्यापाऱ्याला खोटी माहिती पुरवून ‘वो तो बगीचा फट गया, उसमें तो कोलारी है’, अशी बतावणी करून त्याला परत पाठविण्याची शक्कल लढवितात.परिसरात दोन वर्षांपासून पाऊस कमी असल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आटल्या. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे.पाच लाखांची फळे विकली एक लाखालापथ्रोट येथील शेतकरी जगदीशप्रसाद दुबे यांनी तीन लाखांची सत्राबाग व्यापाºयाला पन्नास हजार रुपयांत विकला. पथ्रोट परिसरात आंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. येथील संत्रा शेतकरी नामदेव नागे यांची ४०० झाडावरील संत्राफळे एक महिन्यापूर्वी पाच लाख रुपयांना व्यापाºयाने मागितली होती. मात्र, ती बाग आठ दिवसांपूर्वी पडलेल्या धुवारी (दवामुळे) एक लाखाला विकावी लागली. झाडांच्या देखभालीला लागलेला खर्चही निघाला नाही. ही शेतकऱ्यांची व्यथा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकºयांचे कर्ज तर माफ होत नाहीच, उलट शेतकऱ्यांचे कर्ज अशा परिस्थितीमुळे वाढतच आहे, ही व्यथा आहे.बागा तोडण्याचा वेग वाढणारभूगर्भातील जलस्तर खाली गेल्यामुळे विहिरी खोदूनही पाणी लागत नाही. बोअरवेल आटल्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात पथ्रोट परिसरातील बागा वेगाने सुकण्याचा व तोडल्या जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.