शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 5:00 AM

चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जिल्हा परिषद शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. शाळेत दोन शिक्षक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी शाळेला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी केली.

ठळक मुद्देपालकमंत्री : मेळघाटातील बोरी येथे ‘सरप्राईज व्हिजिट’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जिल्हा परिषद शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. शाळेत दोन शिक्षक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी शाळेला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी केली. त्यांनी अंगणवाडीची तपासणीही केली. मुलांचा आहार तपासला आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भारती ठाकरे ही आठवीतील विद्यार्थिनी हृदयरुग्ण असून, तिच्या उपचारांसाठी कागदपत्रे दाखल करूनही अद्याप मदत न मिळाल्याने पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषद शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेत तीनपैकी एकच शिक्षक उपस्थित होते. एक शिक्षिका व शिक्षक गैरहजर आढळल्याने तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तपासणीत स्वच्छतागृहांची दुरवस्था निदर्शनास आली. त्याच प्रमाणे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याचे आढळले. या स्थितीत तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावातील इतर सुविधांची त्यांनी पाहणी केली. गावात नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जात असल्याचे दिसून आले. त्याबद्दल पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाईसर्व यंत्रणांकडून नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नागरिकांसाठी शासनाने दिलेल्या सेवा-सुविधांत प्रशासनाकडून काहीही कसूर राहता कामा नये. आपण यानंतरसुद्धा मेळघाट व जिल्ह्यात सर्वदूर वेळोवेळी अचानक तपासणी करणार आहोत. कर्तव्यात कसूर होत असल्याचे आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.मेळघाटातील रस्त्यांची कामे १५ दिवसांत सुरू कराचिखलदरा : वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीअभावी चिखलदरा मुख्यालयाला जोडणाºया दोन्ही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मोठे खड्डे पडले आहेत. ती सर्व कामे अधिवेशनापूर्वी १५ दिवसांत सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक पालिकेत सोमवारी स्वागत समारंभानंतर अधिकाºयांची त्यांनी बैठक घेतली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमारेषा वाढल्याने चिखलदरा पर्यटनस्थळाला जोडणाºया परतवाडा-धामणगाव गढी व घटांग मार्गावरील मुख्य रस्त्यांची दैनावस्था झाली आहे.तूर खरेदीसाठी लागवडीचे पूर्ण क्षेत्र धरून उत्पादकता निश्चित करावीअमरावती : आंतरपीक म्हणून तुरीचे अर्धे क्षेत्र नव्हे, लागवडीखालील पूर्ण क्षेत्र गृहीत धरून उत्पादकता निश्चित करावी व त्यानुसार खरेदी करण्यात यावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी पणन महासंघाच्या अधिकाºयांना दूरध्वनीवरून दिले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, पाणीपुरवठा योजनांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, आवश्यक तेथे सर्वेक्षण करुन उपाय योजावेत, असे निर्देश त्यांनी दिले.