लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, कृषिसेवा केंद्रांची तपासणी कृषी अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश शुक्रवारी जि.प. कृषीविषयक समितीच्या सभेत उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांनी दिले.सभेला समिती सदस्य प्रकाश साबळे, गजानन राठोड, राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा विकास अधिकारी वरुण देशमुख, कृषी उद्योगचे सत्यजित ठोसरे, राऊत उपस्थित होते. कृषिसेवा केंद्रात बोगस बियाणे विक्री होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी खबरदारीसाठी या केंद्रांना भेटी देऊन तपासणी करावी व आक्षेपार्ह आढळून आल्यास दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली. यासंदर्भात योग्य कारवाई करण्याच्या सूचना उपाध्यक्ष ढोमणे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खर्चान यांनी आपल्या अधिनस्थ सर्व कृषी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.कृषी सहायकांनी मुख्यालयी हजर राहावेखरीप पेरणीची वेळ लक्षात घेता, प्रत्येक कृषी सहायकाने आपल्या नियुक्तीच्या मुख्यालयी हजर राहावे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे त्वरित निराकरण करावे. याशिवाय जलयुक्त शिवारची कामे पावसामुळे बंद पडली आहेत. त्या कामांची माहिती सादर करावी तसेच कामानुसारच देयके द्यावी, अशा सूचना सभापतींनी या बैठकीत दिल्या.बोगस बियाणे विक्री व शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त प्रत्येक गावातील प्रगतिशील शेतकऱ्याचा कृषी विभाग गौरव करीत आहे.- दत्ता ढोमणे, उपाध्यक्ष तथा कृषी सभापती, जिल्हा परिषद
कृषी केंद्रांच्या तपासणीचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:39 PM
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, कृषिसेवा केंद्रांची तपासणी कृषी अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश शुक्रवारी जि.प. कृषीविषयक समितीच्या सभेत उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांनी दिले.सभेला समिती सदस्य प्रकाश साबळे, गजानन राठोड, राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा विकास अधिकारी वरुण देशमुख, ...
ठळक मुद्देजिल्हा परिषद : कृषी समिती सभेत निर्णय