लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आसाराम चोरमले यांच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत.बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी गाडगेनगरचे मनीष ठाकरे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे, तर फे्रजरपुऱ्याचे आसाराम चोरमले यांची तक्रार महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांना केली होती. आ. रवि राणा यांच्या दोन्ही तक्रारींची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ठाकरे आणि चोरमले यांच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत.ठाकरेंची जिल्ह्याबाहेर बदली करामनीष ठाकरे हे गाडगेनगर पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणेदारांविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या आहेत. अनेक तक्रारी असल्यामुळे त्यांची अमरावती जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी राणा यांनी ठाकरे यांच्यासंबंधाने मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीतून केली होती. याच आशयाची तक्रार आसाराम चोरमले यांच्याविरुद्धही आ. राणा यांनी केली होती. चोरमले यांचीही जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी राणा यांच्या पत्रातून करण्यात आलेली आहे.शासनाचे चौकशीचे आदेशमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश २१ सप्टेंबर रोजी जारी केले आहेत. याअनुषंगाने ता.श्री. भोसले यांच्या स्वाक्षरीने पोलीस महासंचालकांना जारी करण्यात आलेल्या पत्रात, चौकशी करून त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना करण्यात आल्या आहेत. आ. राणा यांच्या या दणक्यानंतर अमरावतीचे पोलीस आयुक्त ठाणेदारांची पाठराखण करतात की निष्पक्ष चौकशी, हे कळेलच!चौकशीचे आदेश झाले,जिल्ह्याबाहेरही जावे लागणार- आमदार राणागाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांची कार्यशैली पोलीसप्रमुखपदाला न शोभणारी आहे. लोकसंरक्षणासाठी दिलेल्या 'वर्दी'चा ते लोकांवर अन्याय करण्यासाठी वापर करतात. उठसूट गुन्हे दाखल करणे हा तर त्यांचा जणू छंदच झाला आहे. महत्त्वाच्या ठाण्यात अशा व्यक्तीची नेमणूक म्हणजे आश्चर्यच होय. फ्रेजरपुºयाचे आसाराम चोरमले यांची कार्यशैलीही पोलिसी खाक्या दाखविणारी आहे. 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या शब्दांची हे अधिकारी ना जाण ठेवतात, ना शान राखतात. लोकांच्या अनेक तक्रारी मला प्राप्त झाल्यात. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. वस्तुस्थिती कथन केली. कारवाई सुरू झाली आहे. दोघांचीही बदली जिल्ह्याबाहेर होणारच, अशी प्रतिक्रिया आमदार रवि राणा यांनी दिली.
गाडगेनगरचे ठाकरे, फ्रेजरपुऱ्याचे चोरमले यांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:04 PM