लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील भातकुली तहसील कार्यालयाचे मुख्यालय भातकुली येथे स्थानांतरित करण्याबाबत ७ नोव्हेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोटिफिकेशन आदेशावर स्वाक्षरी करून पुढील कारवाई करण्याचे निर्देश प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना दिले होते. त्यानुसार, त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार अमरावती येथील भातकुली तहसीलचे स्थानांतरण करण्याबाबतच्या कार्यवाहीचे आदेश भातकुली तहसीलदारांना २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्या प्रयत्नाची ही फलश्रूती आहे.अमरावती शहरात अनेक वर्षांपासून असलेले भातकुली तहसीलचे स्थानांतरण हे त्याच ठिकाणी करण्यात यावे, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे आ.रवी राणा यांनी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर रोजी नोटिफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली. सदर पत्र प्रधान सचिवांना दिले. त्यानुसार सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने भातकुली तहसीलचे स्थानांतरण करण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले होते. यासोबतच महसूल व वनविभागाचे उपसचिव रविराज फल्ले यांनी राजपत्र काढले आहे.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ४०७ महाराष्ट्र जमीन महसूलसंहिता १९६६,२५ नोव्हेंबर २०१९ अन्वये अधिसूचना प्रकाशित केली आहे.एकंदरित भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आ.रवि राणा यांच्या पाठपुराव्यामुळे अमरावती येथील भातकुलीचे तहसील कार्यालय लवकरच स्थलांतरित केली जाणार आहे. यामुळे भातकुली तालुक्यातील जनतेला न्याय मिळणार आहे. याकरिता आ.रवि राणा यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल भातकुली तालुक्यातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
भातकुली तहसील स्थानांतरित करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 6:00 AM
भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्या प्रयत्नाची ही फलश्रूती आहे. अमरावती शहरात अनेक वर्षांपासून असलेले भातकुली तहसीलचे स्थानांतरण हे त्याच ठिकाणी करण्यात यावे, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे आ.रवी राणा यांनी पाठपुरावा केला.
ठळक मुद्देरवी राणा यांच्या पाठपुराव्याला यश : जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश