घनकचरा व्यवस्थापन : पाचही प्रशासकीय झोनमध्ये प्रकल्पअमरावती : स्थानिक इतवारा बाजार येथो सेंद्रिय खत व बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते २ आॅक्टोबर रोजी झाले. यावेळी या मशीनद्वारे खत व बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेने प्रदूषणाला आळा बसणार असून हा प्रकल्प इको फ्रेन्डली आहे. घरातून किंवा बाजारपेठेतून निघणारा निरुपयोगी भाजीपाला गोळा करण्यात येऊन सदर यंत्रणेद्वारे त्यावर हायड्रोलिक प्रेसने दबाव निर्माण करून त्यातील पाण्याच्या अंश बाहेर काढला जाईल व त्यापासून पुढे बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. उर्वरित घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसाठी अॅटोमॅटिक एअरेशन बॉक्सेस बसविण्यात आले असून उरलेल्या चोथ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे. या यंत्राची क्षमता साधारण एका दिवसाला १ टन सेंद्रिय खत निर्मिती करण्याची आहे. या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारे खत महानगरपालिकेच्या बगीच्यामध्ये टाकले जाणार आहे.महापौर चरणजितकौर नंदा यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. या प्रकल्पामुळे निरुपयोगी भाजीपाला निर्मूलन होण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. अनेक दिवसांपासून या प्रकल्पासाठी मनपा प्रयत्नरत होती. पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि हव्याप्रमंच्या मदतीने हा प्रकल्प साकरण्यात आल्याची माहिती यावेळी यंत्रणेने दिली.वेस्टेज भाजीपालावर प्रक्रिया करणारे हे युनिट आहे. नागरिकांनी खराब झालेला भाजीपाला या प्रकल्पाच्या ठिकाणी आणून दिल्यास या प्रकल्पाद्वारे त्या खराब भाजीपाल्याचे निर्मूलन होऊ शकणार आहे. अमरावतीकर नागरिकांनी या प्रकल्पाला प्रतिसाद दिल्यास निरुपयोगी भाजीपाला निर्मूलन करणे सुलभ होईल. तसेच या प्रकल्पातून सेंद्रीय खत व बायोगॅसची निर्मिती होणार आहे. या प्रकल्प उभारणीसह उर्वरित झोनमध्ये आॅर्गेनिक प्रकल्प कार्यान्वित केले जाणार असल्याचे आयुक्त पवार म्हणाले. कचऱ्याचे पृथ्थकरण करून ओला व सुका कचरा वेगळा देण्यात यावा. यामधील आॅर्गेनिक कचरा स्वतंत्र उपलब्ध झाल्यास त्यावर प्रक्रिया करणे सोईचे होईल. यामधील आॅर्गेनिक कचरा स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.या कार्यक्रमास मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथा शेटे, नगरसेवक मिलींद बांबल, नगरसेविका कुसूम साहू, दिव्या सिसोदे, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुखा, हनुमान व्याया प्रसारक मंडळाचे इंजिनिअरींगचे प्राचार्य ए.बी. मराठे, वेस्टबीन सोल्यूशनचे संचालक प्रशांत चेंडके, शहर अभियंता जीवन सदार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नेताम, नगरसचिव मदन तांबेकर, सहाय्यक आयुक्त योगेश पीठे, निवेदिता घार्गे, सोनाली यादव, मंगेश वाटाणे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, संगणक कक्षप्रमुख अमित डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सेंद्रिय खत, बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित
By admin | Published: October 05, 2016 12:17 AM