शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

आयोजक-डीजे मालकाची डीसीपी करणार चौकशी

By admin | Published: September 08, 2015 12:04 AM

दहीहंडी स्पर्धेदरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहीहंडी आयोजक व डीजे संचालकांना ...

दहीहंडी प्रकरण : चौकशीसाठी एकसदस्यीय समिती अमरावती : दहीहंडी स्पर्धेदरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहीहंडी आयोजक व डीजे संचालकांना पोलीस आयुक्तांसमोर हजेरी लाऊन स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती तयार करण्यात आली असून ही समिती घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईची दिशा ठरविली जाईल.रविवारी शहरात तीन ठिकाणी दहीहंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी पोलिसांनी आयोजक व डीजे संचालकांना काही सूचना दिल्या होत्या. डीजेचा आवाज ७५ डेसिबलच्यावर ठेवल्यास ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, राजापेठ, राजकमल व जयस्तंभ या तिन्ही ठिकाणी डीजेची तपासणी केल्यानंतर आवाज ९० डेसिबल पेक्षा अधिक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याची नोंद पोलिसांनी घेतली असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांमार्फत संबधीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी ध्वनीप्रदूषणाचे प्रकरण पोलीस उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर पोलीस आयुक्तांसमोर सुनावणी होईल. दहीहंडीच्या तिन्ही कार्यक्रमामध्ये ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन झाल्याचे तपासणीनंतर लक्षात येत आहे. याबाबत कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये समिती नेमण्यात आली आहे. चौकशीअंती ते पुढील कारवाईची दिशा ठरवतील. - राजकुमार व्हटकर,पोलीस आयुक्त.