१६ ते १८ जून : खास विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रमअमरावती : इयत्ता बारावी व १० वीचा सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुढील प्रवेश घेण्याकरिता लगबग सुुरू झाली आहे. कुठे प्रवेश घ्यायचा, चांगल्या शैक्षणिक संस्था कशा निवडायच्या, प्रवेश घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, अशा भरपूर प्रश्नांचे काहूर विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनात आहे. याचअनुषंगाने शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या लोकमत समूहातर्फे यंदाही अॅस्पायर एज्युकेशन फेअर अर्थातच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. युनिक अॅकेडमी पुणे मुख्य प्रायोजक आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन १६ ते १८ जूनदरम्यान संत ज्ञानेश्वर सांकृतिक भवन, आर्ट गॅलरी , मोर्शी रोड,अमरावती येथे सकाळी ११ ते ९ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणार असून या प्रदर्शनामध्ये नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. पालक असो वा पाल्य, दोघांच्याही मनात करिअरविषयक असणाऱ्या सर्व समस्यांचे याद्वारे निराकरण केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन ग्राफीक्स, आयटीआय, मीडिया आदी करिअरविषयक माहिती येथे मिळेल. तसेच विविध विद्यापीठे, कोचिंग क्लासेस या सर्व संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे, हे निश्चित. या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनीला हजारो विद्यार्थी आणि पालक भेट देणार असून शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकां ंसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची ही अनोखी संधी आहे. यासाठी त्वरित आपले स्टॉल बुक करावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.माहितीचा खजिना होणार उपलब्ध अनेक महाविद्यालये, शाळा अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटेरियर डिझाईनरपर्यंत व रिटेल, आयटीआय,एव्हीएशन, मीडिया, अॅनिमेशन तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, फॉरेन लँग्वेज, स्पोकन इंग्लिश अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक इन्स्टिट्युट या प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. याद्वारे माहितीचा खजिनाच उपलब्ध होणार असल्यामुळे पालकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे.स्टॉल बुकींगसाठी संपर्कमोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्वरित आपला स्टॉल बुक करावा. स्टॉल बुकींगसाठी ९९२२४२७७९४, ९८८११२२३०० वर संपर्क करावा.प्रदर्शनात राज्यभरातील तसेच जिल्ह्यातील व देशपातळीवरील नामवंत शिक्षण संस्थांचा सहभाग.इयत्ता ११ वी व १२ वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त माहितीप्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याने सर्वांना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल.दि. १६ ते १८ जून रोजी, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शन राहणार आहे.
लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन
By admin | Published: June 10, 2017 12:15 AM