भाजपचा इशारा,
मोर्शी : शहरातील सर्व छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना त्यांची प्रतिष्ठाने दोन दिवसांत सुरू करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा भाजपाच्यावतीने ९ एप्रिलपासून सर्व व्यापाऱ्याना संरक्षण देऊन दुकानाचे शटर उघडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष रवि मेटकर यांनी दिला. तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
६ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सलून दुकान, बँड पथक, कॅटर्स, ऑर्केस्ट्रा, फोटोग्राफी, व्यायामशाळा, फेरीवाले, फुटपाथवरील नाश्त्याचे दुकान, चहाटपरी आदी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेल्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे येथील समस्त व्यापारी वर्गांत तीव्र असंतोष उफाळून आला. अन्यथा सर्व व्यापारी प्रतिष्ठानाला संरक्षण घेऊन ९ एप्रिलपासून संपूर्ण दुकाने उघडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असे सुद्धा निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना भाजपचे शहराध्यक्ष रवि मेटकर, जिल्हा सरचिटणीस ज्योतिप्रसाद मालवियसह कार्यकर्ते उपस्थित होते.