लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम ४ मधील तरतुदीचे उल्लंघन करून कर्जवाटप करणाऱ्या पाच सावकारांविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. किरण प्रभाकर विंचुरकर (४४), शंकर देवराव पंचवटे (६०), साईनाथ धन्नालाल जव्हेरी(४५) अभय बाबाराव खोरगडे (४२) व रामदास गुलाब इंगोले (६२,सर्व रा. सराफा बाजार) अशी, आरोपीचे नाव आहे.परवान्यात नमूद कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे शेतकरी शासन लाभापासून वंचित राहिल्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशीत उघड झाले. तक्रारकर्ता राजेंद्र पालेकर अमरावती तालुक्याचे सहकारी संस्था उपनिबंधक आहे. त्यांच्या अधिकारक्षेत्रातील तालुक्यात सावकारांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ च्या अधिन राहून कामकाज करणे अनिवार्य असते. मात्र, पाचही आरोपींनी सावकारी कायद्याच्या कलम ४ मधील तरतुदीचे उल्लंघन करून कर्ज वाटप केले. त्यामुळे शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफीच्या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिले. याची तक्रार राजेंद्र पालेकर (३६,रा.मालवीय चौक) यांनी खोलापुरी गेट पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी पाचही सावकारांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन २०१४ चे कलम ४१ अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बद्रीनाथ सानप यांनी केला.सावकारी परवान्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. संबंधित आरोपींना नोटीस बजावून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू.- दत्ता गावडे,पीआय, खोलापुरी गेट ठाणे
नियमबाह्य कर्जवाटप; पाच सावकारांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:13 PM
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम ४ मधील तरतुदीचे उल्लंघन करून कर्जवाटप करणाऱ्या पाच सावकारांविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. किरण प्रभाकर विंचुरकर (४४), शंकर देवराव पंचवटे (६०), साईनाथ धन्नालाल जव्हेरी(४५) अभय बाबाराव खोरगडे (४२) व रामदास गुलाब इंगोले (६२,सर्व रा. सराफा बाजार) अशी, आरोपीचे नाव आहे.
ठळक मुद्देसावकारी कायद्याचे उल्लंघन : शासन लाभापासून शेतकरी वंचित