शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

माता मृत्यूनंतर नातेवाईकांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माता व बालमृत्यूने नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आणखी एका महिलेचा प्रसूतीदरम्यान शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी रेटून धरली होती. कारवाई करा, अन्यथा पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांसह रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने ...

ठळक मुद्देमृतदेह न उचलण्याचा पवित्रा : डॉक्टरांचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माता व बालमृत्यूने नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आणखी एका महिलेचा प्रसूतीदरम्यान शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी रेटून धरली होती. कारवाई करा, अन्यथा पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांसह रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.भीमनगरातील रहिवासी राधिका मंगेश बनसोड (२१) या महिलेस शनिवारी दुपारी प्रसुतीसाठी डफरीनमध्ये आणण्यात आले होते. प्रसूतीकळा वाढल्याने तिला वॉर्डातून प्रसूतीगृहात नेण्यात आले. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळबाळंतिणीची प्रकृती चांगली असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांनी दोघांनाही वॉर्डामध्ये हलविले. मात्र, राधिका यांची प्रकृती ठिक नव्हती, त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ती बाब तेथील डॉक्टर व परिचारिकांना सांगण्यात आली. पुढे व्हा, आम्ही येतोच, असे सांगूनही ते उपचारासाठी आले नाहीत. त्यामुळे राधिकावर वेळेवर उपचार झाला नाही. दरम्यान दुपारी ४ वाजता राधिका यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने राधिकाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती रिपाइंचे जिल्हा संघटक अमोल इंगळे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ डफरीन रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षक संजय वारे यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे राधिकाचा मृतदेह रुग्णालयातून न उचलण्याची भूमिका रिपाइंने शनिवारी रात्री घेतली होती. दरम्यान पोलिसांनी डफरीन गाठून तणावाची स्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणात नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून दोषी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रविवारीसुद्धा या प्रसूतेच्या शवविच्छेदनावेळी तणावपूर्ण वातावरण होते.इन कॅमेरा शवविच्छेदनडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप केल्यानंतर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमुने राधिकाच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले. नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहातून राधिकाचा मृतदेह न उचलण्याची भुमिका घेतल्यामुळे पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, चौकशीअंती दोषीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पार्थीव ताब्यात घेतले.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून यासंबंधित तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणात मर्ग दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल.- कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे