शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

४०० रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:48 PM

देशभरात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा प्रदान करा व कायदा करण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी संप पुकारला. त्यामुळे आएमएच्या अमरावती शाखेशी संलग्न शहरातील ४०० खासगी रुग्णालयांनी सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी बंद ठेवली. केवळ आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने अनेक नियमित रुग्णांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देआयएमएचा संप : केवळ आपात्कालीन सेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशभरात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा प्रदान करा व कायदा करण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी संप पुकारला. त्यामुळे आएमएच्या अमरावती शाखेशी संलग्न शहरातील ४०० खासगी रुग्णालयांनी सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी बंद ठेवली. केवळ आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने अनेक नियमित रुग्णांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदा आणावा, या प्रमुख मागणीसाठी आयएमएने सोमवारी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने देशभरातील डॉक्टर संपावर गेले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संपूर्ण दिवसभर वैद्यकीय तपासणी बंद करण्यात आली. अमरावतीत खासगी क्षेत्रात एकूण ४०० वैद्यकीय उपचार केंद्रे आहेत. तेथील सर्व वैद्यकीय व्यावसायिक संपात सहभागी झाले आहेत. संपकाळात केवळ अतिदक्षता विभाग, इमर्जन्सी रुग्णांनाच सेवा दिल्या गेल्याची माहिती अमरावती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक लांडे यांनी दिली. संपामुळे अमरावतीमधील सर्व खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली होती. या संपामध्ये डॉ. अशोक लांडे, डॉ. निरज मुरके, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. वसंत लुंगे, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. कल्पना लांडे, डॉ. अश्विनीकुमार देशमुख, डॉ. मनीष राठी, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. अनुपमा देशमुख, डॉ. शुंभागी मुंधडा, डॉ. जागृती शहा, डॉ. दिनेश वाघाडे, डॉ. पंकज इंगळे, डॉ. रश्मी कहार, डॉ. भूपेंद्र भोंड, डॉ. संदीप दानखेडे, डॉ. राजेश शर्मा, डॉ. ऋषीकेश नागलकर, डॉ. गोपाल बेलोकार आदींनी सहभाग नोंदविला.पीडीएमसीत पथनाट्यदेशभरात डॉक्टरांचा संप अहिंसात्मक मार्गाने सुरू आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आयएमएच्या संकल्पनेतून डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पथनाट्य हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. याशिवाय शेकडो विद्यार्थ्यांनी काळ्या फित्या लावून निषेध नोंदविला. सायंकाळी ६ वाजतापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहरातील सर्वच डॉक्टर उपस्थित होते, अशी माहिती आयएमए सचिव डॉ. नीरज मुरके यांनी दिली.