वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी शहरातील सराफ लाईनमधील एक युवक कोरोनाबाधीत असताना घराबाहेर आढळून आल्याने अंजनगाव पोलिसांनी सदर युवकावर नगर पालिके च्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सदर ३० वषीरय युवक २३ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने स्थानिक नगरपालिकेत दिलेल्या हमिपत्रानुसार घरीच गृह विलगीकरणात होता. मात्र, तो घराबाहेर पडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. नगरपालिका प्रशासन सदर युवकावर लक्ष ठेवून होते. सदर युवक २ जून रोजी घराबाहेर बसलेला आढळून आला.
आपत्ती व्यवस्थापन व साथ प्रतिबंधक कायद्यानुसार त्याचेविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्यावतीने दादाराव जवंजाळ, नदीम अहमद शहाबुद्दिन यांनी अंजनगाव पोलीस ठाण्यात दिली. अंजनगाव पोलिसांनी सदर युवका विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.