शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

‘त्या’ घटनेप्रकरणी राजदीप बॅग हाऊसच्या मालकांना अटक; एकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

By प्रदीप भाकरे | Published: November 01, 2022 6:12 PM

Amravati Building Collapse : इमारत कोसळून पाच जणांचा झाला होता मृत्यू

अमरावती : स्थानिक प्रभात चौकातील राजेंद्र लॉजची अतिशिकस्त इमारत कोसळून मलम्याखाली दबल्याने पाच जणांचा मृत्यू तर दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी महापालिकेच्या उपअभियंत्याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री राजदीप बॅग हाऊसच्या दोन मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी त्या दोघांना अटक करण्यात आली.

हर्षल भरत शहा व महिला (दोघेही रा. मांगिलाल प्लॉट, ह.मु.मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना मंगळवारी दुपारी स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने हर्षल शहा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी तर महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. राजापेठ झोनचे उपअभियंता सुहास चव्हान यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री ८ च्या सुमारास शहांविरुद्ध भादंविचे कलम ३०४अ, ३३८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

अतिशिकस्त इमारतीच्या मलम्याखाली दबून व्यवस्थापकासह चार मजुरांचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले. तर दुसरीकडे घटनेची भीषणता पाहता पोलिसांनी देखील तातडीने सुत्रे हलविली. हर्षल शहा हा अमरावतीत पोहोचताच त्याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. तर त्याच्यासोबतच्या सहमालक महिलेला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. 

अशी घडली होती घटना

प्रभात चौकातील राजेंद्र लॉज या जीर्ण इमारतीला पाडण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. त्यानुसार गत महिन्यात राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाडण्यात आले होते. मात्र, त्या जीर्ण इमारतीत तळमजल्यावर राजदीप एम्पोरियम बॅग हाऊस सुरू होते. तेथे रविवारी दुपारी दुरुस्तीच्या कामादरम्यान अचानक ती जीर्ण इमारत कोसळली. यामध्ये रिजवान शाह शरीफ शाह (२०, रा. उस्माननगर), मोहम्मद आरिफ शेख रहीम (३०, रा. रहेमतनगर), कमर इकबाल अब्दुल रफिक (३६, रा. रहेमतनगर), देवानंद हरिश्चंद वाटकर (४०, रा. महाजनपुरा) व रवी त्रिभूवन परमार (४०, रा. साईनगर) यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात राजेंद्र रामेश्वर कदम (४५) रा. आनंदनगर व एक महिला जखमी झाली होती.

सदोष मनुष्यवधाच्या त्या दाखल गुन्ह्याप्रकरणी हर्षल शहा व एका महिलेला अटक करण्यात आली. न्यायालयाने हर्षल शहा याला पोलीस कोठडी तर महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान सखोल चौकशी केली जाईल.

भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, राजापेठ विभाग, अमरावती

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती