लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील जुन्या बायपासलगत असलेल्या आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षांत २० फुटांपर्यंत वृक्षांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून या वृक्षांची सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.अमरावती - बडनेरा मार्गावर जुन्या बायपासलगत काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाची खुली जागा होती. या जागेवर महापालिका सफाई कर्मचारी कचरा टाकून परिसरात पसरवीत होते. काहींनी ही जागा अतिक्रमण करण्याचे मनसुबे बांधले होते. मात्र, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या पुढाकाराने या खुल्या जागेवर आॅक्सिजन पार्क साकारण्याचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने गतवर्षी राज्याचे वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आॅक्सिजन पार्कची पायाभरणी करण्यात आली. आता वर्षभरानंतर या पार्कमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांचे संगोपन, संवर्धन करण्यात आले आहे. भकास असलेला हा परिसर हिरवळमय झाला आहे. एका वर्षात २० फुटांपर्यत वृक्षांची ऐतिहासीक वाढ करण्यासाठी उपवनसंरक्षक हरिश्र्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. तर, २५ फुटांपर्यंत बांबुची वाढ करण्यात आली असून, या वृक्षांचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य रविवार, ७ आॅक्टोबर रोजी भव्य वृक्ष सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना एकूण ५ सायकली प्रदान केल्या जातील. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना एकूण ५ सायकली प्रदान केल्या जातील. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने पाहुण्यांच्या उपस्थितीत ५१ सायकली प्रदान केल्या जातील, अशी माहिती वन विभागाने दिलीआॅक्सिजन पार्कमध्ये वर्षभरात वनकर्मचाऱ्यांच्या श्रमातून तयार झालेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. शालेल विद्यार्थ्यांसाठी वृक्ष सजावट व रांगोळी स्पर्धा घेतली जाईल. गरजूंना लोकसहभागातून सायकली वाटप केल्या जातील.- अशोक कविटकर,सहायक वनसंरक्षक
आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षात २० फूट वृक्षांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 9:45 PM
येथील जुन्या बायपासलगत असलेल्या आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षांत २० फुटांपर्यंत वृक्षांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून या वृक्षांची सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देवृक्षांची सजावट, रांगोळी स्पर्धा : जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत उपक्रम