परतवाडा : अचलपूर कुटी रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सीजन प्लांट उभारण्यास मंजुरात देण्यात आली आहे. या प्लांट उभारणीकरिता आवश्यक प्राथमिक व्यवस्था म्हणून लागणारा एक ओटा आणि त्यावर शेडच्या बांधकामाचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. या अनुषंगाने अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभाग सक्रिय झाला आहे.
या रुग्णालयाला ऑक्सिजनचे ४० सिलिंडर लागतात. याची पूर्तता करून गरजूंना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, या उदात्त हेतूने अचलपूर कुटीर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसी माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणेला देण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे मेळघाटसह लगतच्या परिसरातील रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा कमी होणार आहे.
कोट
कुटीर रुग्णालय परिसरात हा ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.
डॉ. जाकीर, डेडिकेटेड कोविड रुग्णालय, अचलपूर
कोट २
ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता आवश्यक काँक्रीट ओटा व शेड उभारण्यास प्रशासनाकडून सुचविण्यात आले आहे.
विजय वाट, उपविभागीय अभियंता, साबांवि
कोट ३
ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष प्रयत्न आहेत. दरम्यान आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्याला संबंधित यंत्रणा आकार देईल. यात वेळ लागू शकतो.
- संदीपकुमार अपार, एसडीओ, अचलपूर