शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

लसीकरणाची कासवगती, प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:13 AM

अमरावती : जिल्ह्यात लसींचा पुरवठा विस्कळीत असल्यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली ...

अमरावती : जिल्ह्यात लसींचा पुरवठा विस्कळीत असल्यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तरुणाईला केंद्रांवरून माघारी परतावे लागत आहे. अद्याप १.३० लाख तरुणाईचा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही डोस मिळण्यासाठी दोन वर्ष लागणार का, अशीच स्थिती राहिल्यास कोरोनाशी कसे लढणार असा, या तरुणाईचा सवाल आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील तरुणाईचेही लसीकरण सुरु झालेले आहे. मात्र, या सहा महिन्यांच्या कालावधीत फक्त ७,८७,८१५ नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे. यामध्ये फक्त २,०९,०५४ नागरिकांनी दोन्ही डोस घेतला. ही सात टक्केवारी आहे. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी सामूहिक रोग प्रतिकारशक्ती तयार होणे महत्त्वाचे आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाअभावी डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सामना कसा करणार, असा नागरिकांचा सवाल आहे.

बॉक्स

९० केंद्रात सुरू आहे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना लसींच्या पुरवठ्यानुसार लसीकरण केंद्रांचे नियोजन ठरविले जात आहे. सध्या पुरवठाच विस्कळीत असल्यामुळे ९० ते १०० केंद्रांमध्ये सद्यस्थितीत लसीकरण होत आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील १९ केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत अर्धाही लसींचा पुरवठा होत नाही. त्यामुळे ५० वर केंद्र नेहमीच बंद राहतात. लस मिळण्यासाठी नागरिक पहाटेपासून रांगा लावतात तर काही जण ग्रामीणमध्येही जात आहेत.

बॉक्स

लसीकरण का वाढेना

मागनीच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शिल्लक डोसचे रोज सायंकाळी नियोजन केले जाते. नागरिकांना याची माहिती मिळत नसल्याने अनेकांना केंद्रांवरून माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे.

कोट

अद्याप पहिलाच डोस नाही

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली. डेंटल कॉलेज केंद्र होते, लसीकरणाला गेलो असता डोस संपल्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन नोंदणी असतांना दुसऱ्या दिवसी बोलाविले. कामामुळे जाणे झाले नाही. त्यामुळे अद्याप पहिलाही डोस घेतला नाही.

- एक लाभार्थी

लसीकरणासाठी दोनवेळा सकाळपासून तीन तास रांगेत होतो. काही नंबर राहिले असताना डोस संपल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिसऱ्यांदा रांगेत लागण्याचा प्रयत्न केलाच नाही. ओळखीच्या लोकांचा आल्याबरोबर नंबर कसा लागतो.

- एक लाभार्थी

बॉक्स

केवळ वेटींग

दिनांक दिवसाचे लसीकरण एकूण लसीकरण

पहिल्या दिवशी किती जणांना मिळाली लस : ३०

१ फेब्रुवारी २६९ ४,३१७

१ मार्च ६७९ २८,७००

१ एप्रिल ३,१२७ ३,२१,४४४

१ मे १,८५४ ४,७७,८०३

१ जून ५,९९६ ६,२८,५१९

१ जुलै ५,०६५ ७,०९,०६९

२७ जुलै १०,७९४ ७,८७,८१५

बॉक्स

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण संख्या पहिला डोस एकूण

आरोग्य कर्मचारी २०,९५५ १४,८७३ ३५,८२८

फ्रंट लाईन वर्कर ४२,११८ १५,१४७ ५७,२६५

१८ ते ४४ वयोगट १,४४,४४७ १४,२६३ १,५८,७१०

४५ ते ५९ वयोगट १,९१,७६८ ७५,६७१ २,६७,४३९

६० वर्षांवरील १,७९,४७३ ८९,१०० २,६८,५७३