लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ मंगळवारी प्रारंभ झाला. तालुक्यातील तरोडा येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता. नवागत विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.गुढी, तोरण, रांगोळी, सजावट अशा आनंदी, उल्हासी वातावरणात नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. नवागत विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन करून औक्षणानंतर त्यांना रोपांसह मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच वृषाली इंगोले, शिक्षण विस्तार अधिकारी वनमाला अघडते, साधन व्यक्ती धीरज जवळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन शेलोकर, उपाध्याक्ष रमा काळपांडे, सदस्य गजानन वाघाडे, राजेंद्र गजभिये, अनिता इंगोले, सुवर्णा शेलोकर, राजेश काळपांडे, दिनेश जगताप, विनोद शेंद्रे, रामबत्ती धुर्वे, वैशाली जगताप, ग्रा.पं. सदस्य गोपाल शेलोकर, स्वाती बोदिले, प्रतिभा काळपांडे, बेबी वाघाडे, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक शकील अहमद यांनी केले. प्रास्तविक शिक्षक पवन बोके तर आभार संगीता ठाकरे यांनी मानले.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. बीडीओ पंकज भोयर, गट शिक्षणाधिकारी सुषमा मेटकर, विस्तार अधिकारी वनमाला अघडते, गटसमन्वयक गौतम गजभिये, केंद्रप्रमुख प्रफुल्ल महल्ले आदींच्या मार्गरदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.लाभचंद विद्यालयात प्रवेशोत्सव साजराधामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा यांनी गुलाबपुष्प देऊन व पेढा भरवून मन:पूर्वक स्वागत केले. प्राचार्यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून दिले. शाळेच्या प्रथम दिवशी शासनातर्फे मोफत मिळणाऱ्या वर्ग ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला विद्यालयाच्या दर्शनी फलकावर ‘लोकराजा’चे सुंदर रेखाटन केले व शाहू महाराजांच्या प्रतिमेचे विद्यालयाच्या प्राचार्यांनी पूजन केले.
सभापतींनी केले विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:13 PM
नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ मंगळवारी प्रारंभ झाला. तालुक्यातील तरोडा येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता. नवागत विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये हर्षोल्हास : बैलगाडीतून मिरवणूक, रोप देऊन स्वागत