शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

प्रहार शेतकरी, सहकार पॅनेलमध्ये थेट लढत

By admin | Published: September 08, 2015 12:12 AM

तालुक्यात सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बाजार समितीची निवडणूक १५ सप्टेंबर रोजी होत आहे.

राजकीय आखाडा : चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक, दोन अपक्षही मैदानात चांदूबाजार : तालुक्यात सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बाजार समितीची निवडणूक १५ सप्टेंबर रोजी होत आहे. यासाठी प्रहार शेतकरी पॅनेल व सहकार पॅनेल रिंगणात आहेत. या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. आपल्या विजयासाठी दोन्ही पॅनेलचे जेते व पदाधिकाऱ्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधने सुरू केले आहे. प्रशासनाने या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी केली आहे. या बाजार समितीचे संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे मधंतरी शासनाने निवडणूक न घेत प्रशासनाची नियुक्ती केली होती. आता प्रशासक कारकीर्दीनेच निवडूक होत आहे. या निवडणुकीत आ. बच्च कडू यांचे नेतृत्वात प्रहार शेतकरी पॅनल रिंगणात आहे. या पॅनलतर्फे सेवा सहकारी संस्था मतदार संघाच्या सर्व साधारण गटात विलास अकोलकर, सहदेवराव इंगले, अशोक कसर, संदीप घुलक्षे, नवीनकुमार भोजने, सतीश मोहोड, अश्विन भेटाळू, महिला राखीवमध्ये मीरा राजाभाऊ किटकले, वर्षा दिलीप विघाते, इतर मागासवर्गीयमध्ये संतोष धर्माळे, विमुक्त भटक्या जमातीमध्ये प्रशांत श्रीकृष्ण उघडे, ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटात योगिता मनोज जयस्वाल, विनोद दादाराव जवंजाळ, अनुसूचित जातीजमातीमध्ये सुभाष संपतराव मेश्राम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये मंगेश बबनराव देशमुख, हमाल तोलारी मतदारसंघात सत्त्तार खाँ अब्दुल खाँ तर व्यापारी व अडते मतदारसंघात सौरभ महेश नांगलीया व अमित विजय भुजने मैदानात आहेत. प्रहार शेतकरी पॅनल विरोधात जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख, भाजपचे प्रमोद कोरडे, शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेल उभे आहे. या पॅनेलमध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटात प्रमोद घुलक्षे, सतीश रुपराव धोंडे, दिलीप देवीदास धोंडे, हरिभाऊ बोंडे, नंदकिशेर इंगळे, इंद्रप्रथा गजानन भुस्कटे, इतर मागासवर्गीय गटात अरविंद गुलाबराव लंगोटे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटात विकास विक्रम शेकार, ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटात अमर राजेंद्र चौधरी, मुकुंद शामराव मोहोड, अनुसूचित जाती जमाती गटात प्रमोद उत्तम धाकडे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटात उमेश वासुदेव कोठाळे, हमाल तोलारी मतदार संघात गोपाल संपतराव सोनवने तर व्यापारी अडते मतदार संघातून मनोज नांगलीया व अमोल लंगोटे रिंगणात आहेत. तर या निवडणुकीत कैलस नामेदवराव तायवाडे यांनी सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून तर रमेश गणेशराव मोहोड यांनी ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मते विभाजनाची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही पॅनेलच्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने दोन्हीकडचे नेते व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कामाला लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)१५७० मतदारांसाठी पाच गावांत ११ मतदान केंद्रबाजार सिमतीच्या टीएमसी परिसरात केंद्र क्र १ वर सेवा सहकारी सोसाटीचे २०४ तर केंद्र क्र. २ वर ग्रामपंचायतीचे १८६ मतदार मतदान करू शकतील. ब्रा.थडी येथील केंद्र क्र. ३ व ४ नागनाथ विद्यालयात सेवा सहकारी चे १०२ तर ग्रा.पं.चे १३४ मतदार मतदार करतील. करजगाव शंकर विद्यालयात केंद्र क्र. ५ वर सेवा सह. चे ७२ तर केंद्र क्र. ६ वर ग्रा.पं. चे ७२ मतदार मतदान करु शकतील. तळेगाव (मो. ) गुणवंत बाबा विद्यालयात सेवा. स.चे. ८६ व ग्रा.पं.चे ९२, आसेगाव येथे सेवा सह. चे ७५ व ग्रा.पं.चे ९७ तर टी.एम.सी परिसरात अडते-व्यापारी २६० तर हमाल तोलारी चे १९० मतदाांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता टी.एम.सी. परिसरात पाच टेबलावर मतमोजनी होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी अनिरुध्द राऊ त यांनी दिली.