लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : देवी रुक्मिणीचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून देवी रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. संस्थानच्या पालखीसमवेत शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या पालखीला तब्बल ४२५ वर्षांची परंपरा आहे.देवी रुक्मिणीच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम मिर्चापूर येथे वेरुळकर कुटुंबाकडे राहतो. शुक्रवारी सायंकाळी ही पालखी कुºहा येथे दाखल होईल. तेथील मारोतराव सुने यांच्याकडे पालखीचा मुक्काम असतो. कौंडण्यपूरहून पंढरपूरसाठी निघालेल्या पायदळ पालखीमध्ये शेकडो वारकऱ्यांचा सहभाग आहे. यात पुरुष-महिलांसह युवा वर्गाचाही सहभाग आहे. पालखी पंढरपूरला दाखल होईपर्यंत या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या तीनशेपर्यंत पोहोचते. मजल दरमजल करीत वारकरी दीड महिन्यांत पंढरपूर गाठतात. या वारीदरम्यान ४२ गावांत मुक्काम होतो. याशिवाय रस्त्याने लागणाºया प्रत्येक गावात पालखीच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी शेकडो भाविक येत असतात. पूर्वापार चालत आलेल्या ठिकाणीच पालखीचा मुक्काम राहतो. त्यातील काही वारकºयांचे वंशज पालखीचे आदरातिथ्य करतात, अशी माहिती विठ्ठल रुख्मिणी संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर व सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे यांनी दिली.तीरथ महाराज बाराहाते, अशोक महाराज उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक भजने, पदन्यास व फुगड्यांच्या उत्साहात ही पालखी कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.बियाणी चौकात शासकीय पूजाकौंडण्यपुरातील पालखी रविवारी सायंकाळी ५ वाजता अमरावती शहरात दाखल होणार आहे. अमरावती शहरातील बियाणी चौक येथे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर दरवर्षीप्रमाणे जंगी स्वागत करणार आहेत. येथेच देवी रुक्मिणीच्या पालखीची शासकीय पूजा करण्यात येईल. शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित राहतील. इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक येथेही जिल्ह्यातील विविध मान्यवर व लोकप्रतिनिधी पालखीचे स्वागत करणार आहेत. नंतर पालखीचा मुक्काम एकवीरा संस्थानमध्ये राहील.
कौंडण्यपुरातील देवी रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 1:25 AM
देवी रुक्मिणीचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून देवी रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. संस्थानच्या पालखीसमवेत शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
ठळक मुद्देरविवारी सायंकाळी अमरावतीत होणार दाखल : यशोमती ठाकूर करणार स्वागत; दीड महिन्यात ४२ ठिकाणी राहणार मुक्काम