संत्राच्या फळगळीचे पंचनामे तातडीने करा; अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2024 08:42 PM2024-09-01T20:42:50+5:302024-09-01T20:45:16+5:30

बाधित फळबागांची पाहणी

panchnama of orange fruit drop immediately ncp dcm ajit pawar instructions to the district collector | संत्राच्या फळगळीचे पंचनामे तातडीने करा; अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

संत्राच्या फळगळीचे पंचनामे तातडीने करा; अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमरावती : सततच्या पावसामुळे बाधित संत्रा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना रविवारी दिले. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांनादेखील सूचना केली.

वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली. सततच्या पावसामुळे संत्राच्या बहराची गळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या फळगळीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना फळपीक विम्याची मदत मिळावी, यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना दिल्या.

पवार यांनी संत्रा पिकाबाबत माहिती घेतली. संत्रा पिकासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन याबाबत माहिती जाणून संत्र्याच्या असणाऱ्या जाती, चवीने उत्कृष्ट असणाऱ्या फळाची जाती, याबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा उत्पादन घेण्यासाठीही पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खा. प्रफुल्ल पटेल, आ. देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते.

मंत्रालय स्तरावर प्रस्ताव सादर करा

पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले तरी त्यानंतरही शेतकऱ्यांचे होत असलेले पिकांचे नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालयस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात यावे. शेतकऱ्यांना मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

Web Title: panchnama of orange fruit drop immediately ncp dcm ajit pawar instructions to the district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.