शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

पंढरपूर स्पेशल रेल्वे १७, २० जुलै रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 10:27 PM

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्ये रेल्वे प्रशासनाने १७ व २० जुलै रोजी स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. तर, पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी १८ व २४ जुलै रोजी स्पेशल रेल्वे गाडी असणार आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वे विभागाचा पुढाकार : विठ्ठल भक्तांसाठी ठरणार पर्वणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्ये रेल्वे प्रशासनाने १७ व २० जुलै रोजी स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. तर, पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी १८ व २४ जुलै रोजी स्पेशल रेल्वे गाडी असणार आहे.विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी वारकरी समुदाय पंढरपुरात जातो. विठ्ठलाचा गजर, पायदळ वारीने पंढरपूरच्या दिशेने दिंड्या रवाना झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा पंढरपूरकरिता स्पेशल रेल्वे गाडी सुरू करून वारकरी समुदायांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या स्पेशल गाडीत १८ सामान्य डब्यांची व्यवस्था करण्यात आली असून, अकोली रेल्वे स्थानकाहून पंढरपूरकडे १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता रवाना होईल. पंढरपूर येथून अमरावतीकडे ही स्पेशल गाडी १८ व २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता रवाना होईल, असे वेळापत्रक तयार केले आहे. विठ्ठलभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा कारवाईचा सामना करावा लागेल, ही बाब अमरावती रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरिक्षक सयाम यांनी स्पष्ट केली आहे.पंढरपूर स्पेशल गाडीचे हे असतील थांबेअमरावती-पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन अमरावती (अकोली), बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, कर्डूवाडी व पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहे.

नागपूर-कोल्हापूर, अमरावती-पुणे या गाडीने करता येईल प्रवासअमरावती- पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीने विठ्ठलभक्तांना पंढरपूरला जाणे सुकर होत असले तरी नागपूर-कोल्हापूर व अमरावती-पुणे रेल्वे गाडीने पंढरपूरकडे जाता यावे, अशी सोय केली आहे. नागपूर-कोल्हापूर ही आठवड्यातून मंगळवार व शनिवारी धावते. बडनेरा रेल्वे स्थानकाहून या गाडीने पंढरपूर येथे जायचे असल्यास सायंकाळी ६ वाजता जाता येईल. अमरावती-पुणे रेल्वनेही जाता येईल. सोमवार व शनिवारी गाडी अमरावती रेल्वे स्थानकाहून निघेल. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरा रेल्वे स्थानकाहून दुपारी २ वाजता रवाना होईल. कुर्डूवाडीपर्यंत सहज प्रवास करून पंढरपूर गाठता येईल. नागपूर-पुणे या गाडीने सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस बडनेरा रेल्वे स्थानकाहून रात्री ९ वाजता जाता येईल. कुर्डूवाडीपर्यत प्रवास करणे सोईचे आहे.