निर्देश : सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रकअमरावती : शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी सर्वच शासकीय कार्यालयात नोंदवही आणि भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २ फेब्रुवारी रोजी जारी केले आहेत. याबाबतचे लेखी पत्र सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.शासकीय कार्यालयात कामासाठी अधिकाऱ्यांना भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांना बरेचदा अधिकारी वेळेवर भेटत नाहीत.त्यामुळे अनेकवेळा कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे अभ्यासगतांना कामाविनाच परत जावे लागते. त्यामुळे कुठल्याही शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताची कामे वेळेवर व्हावीत यादुष्टीकोणातून प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी नोंदवही ठेवावी आणि भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावणे आवश्यक आहे.याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव संतोष भोसले यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेसह सर्वच शासक ीय कार्यालयाना नवीन मागदर्शक सुचनांचे परीपत्रक प्राप्त झाले आहे.शासकीय कार्यालयांना भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या तक्रारींची, कामाची दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याचे दुष्टीने अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी विभागाच्या कामकाजाचे स्वरूप विचारात घेऊन शासकीय अधिकाऱ्यांनी भेटीसाठीचे नियोजन करावे असे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाचे दर्शनी भागात भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावला तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती या ग्रामिण स्थानिक संस्थांना तसेचे महापालिका, नगर परिषदा या नागरी संस्थांनी भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी मध्यवर्ती रजिस्टर ठेवावे तसेच अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पासेसची आवश्यक सोय करावी त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना पूर्व परवानगीने, पूर्वपरवानगीशिवाय भेटणाऱ्या अभ्यागतांसाठी दिवस वेळ निश्चित करूण त्याबाबतची माहिती सूचना फलकावर कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी असे सुध्दा या परीपत्रकात नमूद आहे.(प्रतिनिधी)
अभ्यागतांसाठी लागणार वेळ दर्शविणारे फलक
By admin | Published: February 15, 2016 12:38 AM