शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याची दहशत

By admin | Published: March 25, 2015 12:12 AM

स्थानिक एसआरपीएफ कॅम्प परिसरात काही दिवसांपासून वाघाच्या जातकुळीतील हिंस्त्र श्वापद आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीस्थानिक एसआरपीएफ कॅम्प परिसरात काही दिवसांपासून वाघाच्या जातकुळीतील हिंस्त्र श्वापद आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. त्या परिसरात फिरणारा प्राणी पट्टेदार वाघ की बिबट हादेखील संशोधनाचा विषय ठरला आहे. वनविभागाने त्यासाठीच सर्च अभियान सुरु केले आहे. सोमवारी रात्री वनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक पथकाला मादी बिबट व एक पिल्लू आढळून आले. एका महिलेला पट्टेदार वाघ दिसला. वनविभागाने मात्र तो प्राणी वाघ असल्याची पुष्टी अद्यापर्यंत केली नाही.काही दिवसांपूर्वी वडाळीजवळील एसआरपीएफ पसिरसरात बिबट अनेकदा आढळून आला. त्यानंतर बिबट्याने एका श्वानाला उचलून नेल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. आता पुन्हा सोमवारी व मंगळवारी बिबट दृष्टीस पडल्याने खळबळ उडाली. बच्चे कंपनीला वाघ दिसल्याचीही चर्चा परिसरात सुरु झाली आहे. मंगळवारी सकाळी अर्चना गिरुळकर ही महिला अंगाणातील कपडे वाळू घालत असताना त्यांना इमारत क्रमांक ११ समोरील नाल्याजवळ झुडूपात दोन बिबट दिसले. यांनी बघितला पट्टेदार वाघवडाळी कॅम्प परिसरातील ५०० क्वार्टर परिसरात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ अनेकांच्या दृष्टीस पडला. इमारत क्रमांक ११ जवळील सर्व रहिवाश्यांनी पट्टेदार वाघ बघितल्याने परिसरात दहशद पसरली आहे. प्रतीभा मेश्राम, अर्चना गिरुळकर व सिरसाट यांनी प्रत्यक्ष पट्टेदार वाघ बघितल्याचे.सीसीटीव्हीत बिबट कैद५०० क्वार्टर परिसरातील नागरिकांनी मुद्दामच सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यामध्ये बिबट एका श्वानाला उचलून नेताना कैद झाला आहे. चोरपावलांनी बिबट्याने श्वानावर हल्ला करुन त्याला उचलून नेल्याचे जीवंत चित्रण नागरिकांकडे उपलब्ध आहे.वन्यप्राण्यांच्या धोका कमी करण्यासाठी काय करावेपहाटे, सायंकाळी व रात्रीच्यावेळी जंगलात एकटे जाणे टाळावे. जंगलाला लागून असलेल्या भागात भिंत असावी.बिबट दिसल्यास जंगलात जाणारा मार्ग मोकळा ठेवावा. कुठलाही आक्रमक पवित्रा घेऊ नका. अशावेळी बिबट हल्ला करु शकतो. कचरा व शिळे अन्नपदार्थांची विल्हेवाट लावा जेणेकरून कुत्रे येणार नाहीत.