लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ चिखलदऱ्यात मान्सूनच्या आगमनाने सर्वत्र वातावरण आल्हाददायी झाले आहे. दाट धुक्याने शहरासह रस्ते हरविल्याने पर्यटकांना दिवसा आपल्या वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. रविवारी त्याचा प्रत्यय आला. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूरकर लगतच्या मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा परिसराच्या पर्यटकांनी वातावरणाचा आनंद घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.चिखलदरा पर्यटन स्थळावर ७ ते ११ जूनपर्यंत सलग पाच दिवस बरसल्याने ६२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या पहिल्या सरी चांगल्या बरसल्याने पर्यटन स्थळावर गारवा निर्माण झाला आहे. गतवर्षी १४६० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर ११ जूनपर्यंत ४१ मि.मी. नोंद होती. पावसामुळे परिसरातील नदी-नाले हळूवार खळखळू लागले असून उन्हाळ्यात बोडखे पडलेले जंगल आता कात टाकीत हिरवे होऊ लागले आहे.मान्सूनपूर्व पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरीअमरावती : मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावल्याने आल्हाददायक वातारवण निर्मीत झाले. नैऋुत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन त्याचे रुपातंर वादळात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली. यासंबधाने चक्राकार वारे असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यावर ढंगाची गर्दी झाली आहे. महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. सद्यस्थितीत मान्सून कोकणच्या उत्तर भागात, पश्चिम महाराष्ट्रच्या तसेच मराठवाड्याच्या काही भागात पोहोचण्यास हवामान शास्त्रीय परिस्थिती अनुकुल आहे. त्यामुळे मान्सूनची विदर्भाकडे पुढील वाटचाल सुरु झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी दमदार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. १५ जूननंतर मान्सून विदर्भात दाखल होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. दाट धुक्यात हरविले चिखलदरादाट धुके अन् बेपत्ता रस्तेपावसाच्या आगमनासोबत किंवा चाहूल लागताच विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या पर्यटन नगरीत दाट पांढरे शुुभ्र धुके पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. रविवारी पहाटे ४ वाजतापासून तर शहर आणि रस्ते धुक्यात हरविले होते. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना दिवसा आपल्या दुचाकीसह मोठ्या वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागला. या परिसरात सध्या गारव्याचा आनंद नागरिकांना मिळत आहे.
नंदनवन गारठले
By admin | Published: June 12, 2017 12:09 AM