लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गावरील सेमाडोह येथील सिपना नदीवर भूतखोरा पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता आणि बुधवारी पहाटे ५ वाजता अशी दोन वाहने अडकल्याने चार तास हा मार्ग पूर्णत: ठप्प होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्याने मालवाहतूकदारांसह प्रवाशांना ताटकळत राहावे लागलेपरतवाडा ते धारणी-खंडवा-इंदूर या आंतरराज्य महामार्गात मेळघाटच्या बिहाली, घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत सर्वाधिक घाटवळणाचा मार्ग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून हा महामार्ग आहे. दोन वर्षांपासून हा मार्ग पूर्णत: खडतर झाला, तर दुसरीकडे महाराष्ट्र-मध्य प्रदेश अशी आंतरराज्यीय जड वाहतूक मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस या मार्गावरून आहे. प्रशासनाचा पत्रव्यवहार आणि राज्य शासनाचे वेळकाढू धोरण सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठले आहे.वाहनांच्या रांगासेमाडोह येथील मुलताई ढाणानजीक हा भूतखोरा नामक अरुंद असा पूल आहे मंगळवारी रात्री धारणीकडून लाकडाची वाहतूक करणारा ट्रक येथे नादुरुस्त होऊन बंद पडला, तर बुधवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान एका लहान चारचाकीधारकाने पुलावरून पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहन अडकविले. त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.ट्रक अपघाताची मालिकामागील दोन महिन्यांत बुरडघाट ते सेमाडोह दरम्यान आठ ते दहा वेळा ट्रक रस्त्यावर कोसळून अपघात झाला आहे. नादुरुस्त व खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होत आहेत.भूतखोरानजीक दोन वाहने अडकल्याने वाहतूक खोळंबली होती. नादुरुस्त वाहन काढल्यानतर वाहतूक सुरळीत झाली.- महादेव मानकर, शाखा अभियंता, साबांवि, चिखलदरा
परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्ग चार तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:00 AM