शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

कविता इंगोले मृत्यूप्रकरणी पतीला अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 6:53 PM

नांदगाव खंडेश्वर : चांदूर रेल्वे येथील शिक्षिका कविता कीर्तिराज इंगोले (४०) यांच्या मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी कीर्तिराज नामदेव इंगोले (४२, रा. चांदूर रेल्वे) यास गुरुवारी अटक केली.

नांदगाव खंडेश्वर : चांदूर रेल्वे येथील शिक्षिका कविता कीर्तिराज इंगोले (४०) यांच्या मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी कीर्तिराज नामदेव इंगोले (४२, रा. चांदूर रेल्वे) यास गुरुवारी अटक केली. या प्रकरणी भादंविच्या ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती कीर्तिराज ही मृत कविता इंगोलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता.पगाराचे सर्व पैसे आरोपी देण्यास बजावत होता. तसे न केल्यास त्रास देत होता. या जाचाला कंटाळून एका महिन्यापूर्वी कविता इंगोले नांदगाव खंडेश्वर येथे माहेरी आल्या व येथूनच चांदूरच्या शाळेवर ये-जा करीत होत्या. मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी त्या घरी परतल्या नाही. ८ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. कविताच्या मानेवर व्रण असल्याने भाऊ गजानन कटक तलवारे याने कीर्तिराजवर संशय व्यक्त केला होता.कीर्तिराज कवितासोबत होता, असे चांदूर रेल्वे येथील वकिलानेही सांगितले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यावरून नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून कीर्तिराजला सात तासांत जेरबंद केले. ९ नोव्हेंबरला त्याला नांदगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार व उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मगन मेहते व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहे.