शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

धार्मिक दीक्षा देण्यासाठी आई-वडिलांची बळजबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:39 PM

आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला.

ठळक मुद्देमुलीचा गौप्यस्फोट : बेपत्ता मुलीचा शिरखेड पोलिसांनी लावला शोध

लोकमत न्यूज नेटवर्कनेरपिंगळाई : आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला.रिद्धपूरनजीकच्या ब्राह्मणवाडा (दिवे) येथे स्थित असलेल्या महानुभाव पंथ आश्रमातील रहिवासी सन्याशी गोपालमुनी उर्फ अवेराजबाबा शेवतकर आणि तपस्विनी रत्नाताई शेवतकर यांची दत्तक कन्या स्नेहल (बदलेले नाव) ही सुमारे दीड वर्षांपूर्वी ब्राह्मणवाडा येथील राहत्या घरून बेपत्ता झाली. त्यावेळी नातेवाईक निरंजन ठाकरे, मुलीची मैत्रिण संजीवनी (बदलेले नाव) व अन्य काही मैत्रिणींनी आमच्या मुलीला पळवून लावल्याचा आरोप शेवतकर यांनी शिरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला. त्या अनुषंगाने पोलिसांनी स्नेहलच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरवरून शोध चालविला. त्यावेळी ती औरंगाबाद येथे खासगी नोकरी करीत असल्याचे माहिती पडले. पोलिसांनी तिला परत आणून विचारपूस केली असता, आईवडिलांनी तिला महानुभावपंथाची दीक्षा देण्यासंबंधी जबरदस्ती केल्याने ती मानसिक तणावात आली आणि आई-वडिलांसोबत पटत नसल्यामुळे व ते त्रास देत असल्यामुळे घरातून स्वमर्जीने एकटेच निघून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. स्नेहलाल शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हायचे होते. परंतु, तिचे आई-वडील याला विरोध करीत होते. आतासुध्दा आई -वडिलांकडे न जाता औरंगाबादला रहायचे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले असून, तिने पोलिसांना अ‍ॅफिडेव्हीटसुद्धा करून दिले. सदर मुलीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार, मोर्शी विभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, अधिकारी वैभव पराते, पोलीस हेड कॉन्स्टेबल तिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विवेक हेडावू यांनी कारवाई केली.दत्तक कन्येला पळवून नेल्याची तक्रार महानुभावपंथ आश्रमातील शेवतकर यांनी केली होती. मुलीचा शोध घेऊन विचारपूस केली असता, आई-वडिलांनी धार्मिक दीक्षेसाठी बळजबरी केल्याने निघून गेल्याचे ती सांगत आहे.- सुरेंंद्र अहेरकर, पोलीस निरीक्षक, शिरखेड ठाणे