अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यान्वये आरटीई अंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टाळेबंदीनंतर आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे. त्यासाठीच्या कागदपत्राची पूर्तता करताना पालकांची कसरत होत आहे.
जिल्ह्यात आरटीई प्रवेसाठी २४४ शाळांमध्ये २ हजार ७६ जागांसाठी ५,९१८ हजारांवर अर्ज आले. त्यापैकी १,९८० अर्जांची निवड झाली. कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी सन २०२१-२२ करता ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली होती. ही मुदत २१ मार्चपर्यंत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली होती. जिल्ह्यातील २४४ शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अंतर्गत २०७६ जागांसाठी सुमारे ५,९१८ अर्ज दाखल झालेले अर्ज या प्रक्रियेत वैध ठरले आहेत. यंदा शिक्षण विभागातर्फे संदेश पाठविण्यात आले आहेत. राज्यात संचारबंदी आहे. १ जूननंतर मागे घेण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. शिवाय आरटीई प्रवेशाच्या संदर्भात संकेतस्थळावरही संचारबंदीनंतरच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कळविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बॉक्स
भाडेकराराची प्रत बंधनकारक
नव्या निर्णयानुसार पालकांनी या प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रात भाडेकराराची प्रत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ही भाडेकराराची प्रत द्यावी लागणार आहे.