कार्यालयासमोर वाहने : सगळीकडे असते गोंधळाची स्थितीजितेंद्र दखने अमरावतीजिल्हा परिषदेच्या आवारात एकीकडे वाहनचोरीच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहनतळावर फलके लावूनही येथील वाहनंची समस्या सुटलेली नाही. वाहनतळासाठी जागा निश्चित करूनही त्याकडे पाठ फिरविल्यामुळे जिल्हा परिषदेत इमारतीच्या अवतीभवती बेशिस्तपणे वाहने लावलेली दिसून येतात. त्याबाबत प्रशासनात काम करणाऱ्यावर कुणीही जाब विचारत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. जिल्हा परिषदेच्या आवारातून मागील काही महिन्यांपूर्वी वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून वरिष्ठांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनुुसार पार्किंगचा मुद्दा सोडविण्याचे निश्चितही झाले. यानुसार अधिकाऱ्यांना सूचना, विभागानुसार माहिती संग्लन, जागेची निवड आणि अंतिम निर्णयानंतर पार्किंगसाठी पिवळे पट्टे मारून लाईन आखून दिल्या. वाहन तळाचे जागेवर पार्किंग फलक ही लावून काम पूर्णत्वास आले. आज याच दरम्यान विधीमंडळाची पंचायत राज समितीचा दौरा असल्यामुळे या कालावधीत जिल्हा परिषदेत वाहन पार्किंगला शिस्त लागल्याचे दिसून आले. मात्र पंचायत राज समिती परत जाताच जिल्हा परिषदेच्या आवारात पुन्हा वहन पार्किंगचा खेळखंडोबा सुरु झाल्याचे चित्र अद्यापही कायम आहे. त्यामुळे वाहनतळ निश्चिचत होऊनही त्यात किती वाहने लावण्यास तयार नाही. अगदी बोटावर मोजण्या इतपत वाहने या ठिकाणी रांगेत लावलेली असतात. तर इमारतीच्या अवती-भोवती आजही तेवढयाच बेफिकीरपणे वाहने लावलेली दिसून येतात. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी पार्किंग व्यवस्थेची मागणी करणारे कर्मचार, अधिकारी, आपल्या वाहनांबाबत किती गांभीर्य पाळतात, पार्किंगच्या नियमाचे ते किती पालन करतात याची प्रचिती येते. शिवाय पार्किंगसाठी जागा ठरवून फलके लावून याचा उपयोग तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी परिसरात अस्ता-व्यस्त लावली जाणारे वाहन मालकांचा हा बेदखलपणा सर्वांसाठीच डोकेदुखीचा ठरत असल्याने जिल्हा परिषदेत वाहन पार्किंगला शिस्त लाव ण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद परिसरात पार्किंगचा खेळखंडोबा
By admin | Published: March 11, 2016 12:15 AM