अमरावती ; ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या संसदीय समितीसरकारच्या संसदीय समिती खासदार प्रताप जाधव यांचे यांचे अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य असलेल्या १० खासदारांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांना भेटी देवून कामांची पाहणी केली . यानंतर बुधवार १८ ऑगस्ट रोजी समितीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेसाठी जिल्हा परिषद,बॅक,रोहयो आदी विभागाचा केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा खातेप्रमुखाकडून घेण्यात आला.
केंद्राची ही समिती ग्रामविकासाशी संबंधित असलेल्या १२ विषयांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाली होती. केंद्र शासनाचे मार्फत ग्रामविकास अनेक योनजा राबविण्यात येतात.या योजनेची अंमलबजावणी ग्रामस्तरावर कशा पध्दतीने केली जाते. याचा अभ्यास करण्यासोबतच कामांचीही प्रत्यक्ष पाहणी संसदीय समितीने जिल्ह्यातील निवड गावांना भेटी देवून केली.यात ग्रामपंचायत,पंचायत समिती,बॅक आदी संस्थामध्ये जाऊन आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी महसुल,जिल्हा परिषद,बॅक आदी विभागाचे निवडक अधिकारी उपस्थित होते. बैठकीचा अधिक तपशील मात्र गोपनिय ठेवण्यात आला.त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.या आढाव्यानंतर ही समिती रवाना झाली आहे.