वरूड : तालुक्यात देऊतवाडा येथे गस्तीवर असताना महसूल पथकावर रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली होती. यात एक तलाठी पसार आहेत. वरूड पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
पोलीस सूत्रानुसार आरोपीचे नाव शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा. राजुरा बाजार) असे असून ६ आरोपी अज्ञात आहेत. देऊतवाडा रेती घाटावर रेती तस्करांनी महसूल हल्ला करून गंभीर जखमी केले तर या दुचाकींची तोडफोड केली . यावेळी जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पथकातील कर्मचारी भीतीमुळे लपून गेले होते. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार किशोर गावंडे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी आणि तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. तलाठी केवलसिंग शिवसिंग गोलवाल (रा. महसूल कार्यालय वरूड) यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३०७, ३४, १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हे दाखल केले असून, आरोपी फरार झाले असून ६ सहा आरोपी निष्पन्न झाले असले तरी ५ ते ६ आरोपी अज्ञात आहेत. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांत्या मार्गदर्शनात एपीआय हेमंत चौधरी, उपनिरीक्षक हिवसेसह वरूड पोलीस पथकाने शोध घेतला. मात्र, दुसऱ्या दिवशीसुद्धा आरोपी मिळून आले नाही.
रेती तस्करीच्या घटना घडत असताना प्रशासन गंभीर का नाही?
रेती तस्करांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन गंभीर नाही. रेती वाहतुकीकरिता रेती तस्कारानी आंदोलन केले होते, तर तत्कालीन ठाणेदार श्रेणिक लोढा यांनी कारवाई करून रेती तस्करांना पळो करून सोडले होते, हे विशेष.