शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पाच चेकपॉर्इंटवर प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 6:00 AM

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व अन्य लक्षणे याद्वारे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. बडनेरा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे येथील रेल्वे स्थानकांवर पुणे, मुंबई, नागपूर येथून येणाºया प्रवाशांंची तपासणी होईल.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पथकात आरोग्य, महसूल, पोलीस विभागाचे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या एमएसआरटीसी किंवा खासगी वाहनातील प्रवाशांंची बडनेरा, रेल्वे व बसस्टेशन, गुरुकुंज (ंमोझरी), चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या पाच चेक पॉइंटवर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. २४ बाय ७ या काळात तीन शिफ्टमध्ये हे पथक उपस्थित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिले.जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व अन्य लक्षणे याद्वारे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. बडनेरा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे येथील रेल्वे स्थानकांवर पुणे, मुंबई, नागपूर येथून येणाºया प्रवाशांंची तपासणी होईल.बडनेरा बसस्थानकावर मुंबई, नाशिक, यवतमाळ, अकोला मार्गे येणाऱ्या सर्व प्रवाशांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी महापालिकेचे वैद्यकीय पथक करणार आहे. या चारही पथकांमध्ये प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, एनएम व एमपीडब्लू राहणार आहे. याव्यतिरिक्त नागपूर मार्गे येणाºया प्रवाशांची गुरुकुंज (मोझरी) येथील बस स्थानकामध्ये वैद्यकीय तपासणी केली जाईल.जिल्हा ग्रामिणच्या पथकामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहायक राहतील याव्यतिरिक्त पथकांच्या सोबतीला महसूल विभागाचा प्रत्येकी एक कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा राहणार असल्याची माहिती आहे.गुरुकुंज (मोझरी) व बडनेरा बसस्थानकाची जबाबदारी विभागीय आगार नियंत्रक श्रीकांत गभणे, बडनेरा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे स्टेशनची जबाबदारी स्थानिक स्टेशन मास्तर तसेच वैद्यकीय तपासणीसाठी गुरुकुंज, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पॉइंटकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमाळे, बडनेरा बस व रेल्वे स्टेशनकरिता महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व गुरुकुंज येथील पॉइंटवर पोलीस विभागाची जबाबदारी अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्याकडे राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे. दैनंदिन तपासणी अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला सादर करावा लागणार असल्याची माहिती आरडीसी नितीन व्यवहारे यांनी दिली.बँका अन् एटीएम स्वच्छ ठेवाजिल्ह्यातील बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व बँक व्यवस्थापनाला गुरुवारी दिले. नागरिकांनी आॅनलाईन बँकींगचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी जनजागृती करावी. त्याचप्रमाणे एटीएम मशीनला वारंवार हात लागत असल्याने त्यादृष्टीने मशीनची स्वच्छता ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.चार शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीसकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १४ मार्च रोजी दिले आहेत. मात्र, शिवाजी आयडीयल स्कूल, महर्षी इंग्लिश स्कूल, सेंट फ्रांसिस इंग्लिश स्कूल व साक्षरा इंग्लिश स्कूल सुरू असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या. त्यामुळे २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी बुधवारी दिले आहेत.आंतरराज्यीय सीमेवर लावणार चेकपॉइंटअन्य राज्यातून येणाºया वाहनांमधील प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आता आंतरराज्यीय सीमेवर आता चेक पॉइंट स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य तपासणी पथकाचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात सर्व मार्गाने प्रवेश करणाºया वाहनांतील प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे ते म्हणाले.सरपंच, ग्रामसेवकांवरही जबाबदारीजिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू झाल्याने प्रतिबंधक पाययोजनांसाठी गावागावांतील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावरही आता जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गावात स्वच्छता ठेवण्यासोबत परराज्यातून किंवा जिल्ह्यातून नागरिक आल्यास, त्याला तपासणीसाठी निर्देशित करावे लागणार आहे.२४ नागरिकांचे थ्रोट स्वॉब निगेटिव्हसीएसद्वारे बुधवारी २१ व व तत्पूर्वी तीन थ्रोट स्वॅब असे २४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याच अहवाल गुरुवारी उशीरा निगेटिव्ह प्राप्त झाला. गुरुवारी ११ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याबाबत अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, बसस्थानक, चेकपोस्ट आदी ठिकाणी रँडम तपासणीही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी