अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाॅकडाऊन लागल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात उभ्या होत्या. अशातच प्रत्येक बसमध्ये मेंटेनन्सची कामे निघाली व अनेक बसना गळतीही लागली आहे.
प्रवाशांना गळक्या बसमधून प्रवास करावा लागत असून यामुळे त्यांनी प्रवास मनस्तापही होतो. प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी प्रयत्नरत असलेल्या मंडळींनी गळक्या बसची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमरावतीसह अन्य आगारात असलेल्या गळक्या बसची दुरुस्ती लॉकडाऊन काळात करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी यावर्षी तक्रार आल्या नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन काळ बसच्या दुरुस्तीसाठी उपयोगाचा ठरला. या कालावधीत नादुरुस्ती बसची दुरुस्ती करण्यात येत आहे.
बॉक्स
कार्यालयाकडे मेन्टेनन्स
आगारातील बसचे मेंटेनन्स करण्यासाठी आगारात वेगळा विभाग आहे, शिवाय विभागीय कार्यालयाकडून सर्व साहित्य व सुटे भाग पुरविले जातात. त्यामुळे काही अडचणी नाहीत.
कोट
पूर्वी एसटीचा प्रवास म्हणताच धडकी भरत होती. मात्र, आता एसटीने कात टाकली असून गळक्या तसेच फाटक्या सीटपासून सुटका झाली आहे. आता फक्त रस्त्यामुळेच एसटीच्या प्रवाशांना झटके खावे लागत आहेत.
संदीप कावरे, प्रवासी
कोट
आताच्या एसटी पूर्वीसारखे राहिल्या नाहीत. पूर्वी पाणी गळत असतानाही फाटक्या सीटवर बसून जावे लागत होते. आता मात्र तशा एसटी दिसत नाहीत. बऱ्याच बसेचा चेहरामोहरा बदलून टाकला असून प्रवाशांची सुविधा होत आहे.
- श्रीकृष्ण कडव, प्रवासी
कोट
आता एसटीने कात टाकली असून प्रवाशांच्या सोयीनुसार बदल केले जात आहेत. आगाराकडे गळक्या काही बस होत्या. त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. लाॅकडाऊनचा कालावधी दुरुस्तीसाठी उपयोगी आला आहे. सध्या तरी एसटी महामंडळाच्या बस गळक्या नाहीत.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक