पान २ ची बॉटम
फोटो पी १० परतवाडा रोड
परतवाडा : अमरावती-परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्ग खड्ड्यात गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला ठिगळ लावण्याचे काम करावे लागत आहे. नियमबाह्य धावणाऱ्या ओव्हरलोड ट्रकमुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तीन वर्षांपूर्वी परतवाडा शहरातील मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या मार्गावर ठरावीक ठिकाणी खड्डे पडत असल्याने त्याचा फटका चारचाकी व दुचाकीस्वारांना बसत आहे. अनेक ठिकाणे अपघातप्रवण स्थळ झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यावर लाखो रुपयांचा दुरुस्ती खर्च करावा लागत आहे. शहरातील मिल कॉलनी स्टॉप, बस स्थानक परिसर, बाजार समिती गेट, अशा काही ठराविक ठिकाणी हे खड्डे सतत पडतात. क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणारे मालवाहू ट्रक रात्रंदिवस परतवाडा-अमरावती महामार्गावर धावतात. परिणामी शहरातून जाणाऱ्या रस्त्याने जीवघेणे खड्डे पडतात आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षभर त्यावर ठिगळ लावले जाते. हे चित्र आता शहरवासीयांसाठी नेहमीचे झाले आहे.
बॉक्स
आरटीओ विभाग लक्ष देईल का?
क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मध्यप्रदेशातून राज्यात येणाऱ्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक साहित्य असते. परतवाडा ते धारणी मार्गावर वझ्झरनजीक चेक पोस्ट आहे. तेथे तपासणी होते किंवा नाही, हा संशोधनाचा विषय आहे.