शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

ग्राफीनच्या पेस्टचे पेटेंट; अमरावती विद्यापीठातील पहिले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:49 PM

ग्राफीन या कार्बन संवर्गातील आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या संयुगाच्या नव्या पद्धतीचे पेस्ट (अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ ग्राफीन पेस्ट) या आविष्कारासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक संदीप आनंदराव वाघुळे यांना पेटेंट मंजूर झाले आहे.

ठळक मुद्देसंशोधक संदीप वाघुळे यांचा सन्मान

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्राफीन या कार्बन संवर्गातील आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या संयुगाच्या नव्या पद्धतीचे पेस्ट (अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ ग्राफीन पेस्ट) या आविष्कारासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक संदीप आनंदराव वाघुळे यांना पेटेंट मंजूर झाले आहे. हे पेटेंट अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिले ठरले आहे.भारत सरकारच्या पेंटेट प्रमाणपत्र कार्यालयात सन २०१२ मध्ये संदीप वाघुळे यांनी आपल्या आविष्काराला पेटेंट मिळवण्याकरिता अर्ज सादर केला होता. या आविष्काराच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा तपासणी, चाचण्या आॅनलाइन घेण्यात आल्यात. त्यानंतर २० फेब्रुवारी २०१९ रोजी या आविष्काराचे अधिकार (पेटेंट) संदीप वाघुळे यांना मंजूर करण्यात आले आहे. ग्राफीनच्या संशोधनाबद्दल भौतिकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार अलीकडे २०१० मध्ये अँॅड्र्यू जीम व कॉन्स्टनटाइन नोवोसेलव्ह या युनायटेड किंगडमच्या संशोधकांना मिळाले. याच विषयात संशोधन करीत असलेले संदीप वाघुळे यांनी ग्राफीन हा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत सर्वप्रथम २०११ मध्ये तयार केला. संशोधनादरम्यान ब्लॉकिंग इलेक्ट्रोडची आवश्यकता त्यांना भासली. ग्राफीन हा पदार्थ तयार असल्यामुळे त्यामध्ये योग्य बाइंडर घालून पेस्ट तयार करून पाहिले. ही पेस्ट फोटोवोल्टेक सेलचे ईलेक्ट्रोड, सुपरकॅपिसिटरचे इलेक्ट्रोड आणि रिमोट कंट्रोलचे इलेक्ट्रोड म्हणून उत्तमरीत्या वापरण्यात येऊ शकते, हे स्पष्ट झाले. वाघुळे यांनी ग्राफीन हा पदार्थ गॅस सेंसरच्या वापरासाठी तयार केला होता. परंतु, तो इलेक्ट्रोड म्हणून संशोधनातून वापरण्यात आला. अशा पद्धतीने अपघातानेच ग्राफीन पेस्टचा आविष्कार लागला.जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षणसंदीप वाघुळे हे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील मार्कंडा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण मार्कंडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतले. येथूनच माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालय आणि आचार्य पदवी शासकीय विदर्भ महाविद्यालयातून पूर्ण केली, हे विशेष.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र