शासन निर्णयाला छेद : कशासाठी खपवून घेतात मुजोरी अमरावती : जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा जेमतेम कारभार सुरू झाला असताना ‘पतीराज’ हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे पदाधिकारी महिला की पुरूष हे अधिकाऱ्यांनाही कळू शकत नाही. नेमके कुणाचे ऐकावे या व्दिधावस्थेत अधिकारी आले आहेत. मात्र शासन निर्णयानुसार ‘पतीराज’ हस्तक्षेप नको असे असतानाही अधिकारी कशासाठी हतबल होतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा परिषदेत नव्यानेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर वनिता पाल यांची नियुक्ती झाली आहे. मात्र त्याच्यासाठी जुन्या वाहनाऐवजी नवीन वाहन मिळविण्यासाठी प्रशासनालातील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना श्रीपाल पाल यांनी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या माध्यमातून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केले. यासाठी श्रीपाल पाल यांची बाजू घेत उपाध्यक्ष ढोमणे यांनीही संबंधित अधिकाऱ्याला ‘वाहन द्या ; नाही तर माझे वाहन देऊन मीच पायी जातो’ असा दम भरत अधिकाऱ्यांना नियम डावलून महिला व बालकल्याण समिती सभापतींना अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या नावाने असलेले एमएच २७ अे.अे ६५२ क्रमांकाचे वाहन देण्यास दबाब तंत्राचा वापर वाहन मिळवून दिले. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यानंतर अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी हे महत्वाचे पद आहे. हा विषय त्यांचे पती श्रीपाल पाल यांनी अधिकारी व उपाध्यक्षांपर्यत नेऊन नियुक्तीच्या दिवसापासूनच सभापतींच्या कामकाजात हस्तक्षेप करत रेटून धरला. एकीकडे शासनाने महिलांच्या सबलीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखिव असल्याची तरतूद केली. मात्र याचा फायदा हा महिला पदाधिकाऱ्यांन पेक्षा पतीराजच अधिक करत असतील तर शासन निर्णय, धोरणाचा उपयोग तरी काय? या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे. त्याच यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ‘पतीराज’ सारख्या बिनधिकत वावणाऱ्या समोर का म्हणून झुकावे हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनात काम करतांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून कायदा,नियम,धोरण यांचा वापर केल्यास पतीराज सारख्या प्रकारांना आळा बसू शकेल अन्यथा असे प्रकार हे दिवसेदिवस कमी होण्यापेक्षा जास्त होतील हे मात्र नाकारता येणार नाही. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला तर ही डोकेदुखी कायमची मोडीत निघू शकते.
‘पतीराज’पुढे अधिकारी हतबल
By admin | Published: April 22, 2017 12:23 AM