शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पंधराव्या वित्त आयाेगाच्या निधीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:10 AM

अमरावती : कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित व अबंधित निधीचा वापर करण्यास ...

अमरावती : कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित व अबंधित निधीचा वापर करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रस्तावित, सामूहिक आरोग्य विमा योजनेचा हप्ता भरणे, कोविड चाचणी व लसीकरणासाठी जिल्हा परिषद पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वापरता येणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीपैकी ग्रामपंचायतींना ८० टक्के, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के निधीचे वितरण केले जाते. या निधीतून कोविड नियंत्रण व्यवस्थापनासाठीही जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना निधी खर्च करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामपंचायतींना उपलब्ध असलेल्या अबंधित निधीपैकी शिक्षण व आरोग्यासाठी २५ टक्के निधी खर्च करता येतो. त्यामुळे आरोग्यविषयक बाबींसाठीच्या निधीतून कोविड व्यवस्थापनासाठी खर्च करण्यास परवानगी दिली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना प्राप्त निधीबाबत स्पष्ट सूचना नसल्याने त्यांना कोविड व्यवस्थापनासाठी त्यातून खर्च करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रम होता. त्यामुळे राज्य शासनाने आता जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना बंधित व अबंधित निधी खर्च करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शासननिर्णयानुसार कोविड व्यवस्थापनासाठी मास्क, स्वच्छताविषयक साधने, पीपीई किट, ऑक्सिमीटर, पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, वाफ घेण्याचे यंत्र तसेच विलगीकरण कक्षासाठी साहित्य खरेदी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करता येणार आहे, तसेच बंधित निधीतून संबंधित स्वच्छतेची कामे करण्यास परवानगी दिली आहे.

बॉक्स

विमा हप्ता भरण्यास परवानगी

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोविड व्यवस्थापनाबरोबरच प्रस्तावित सामूहिक आरोग्य विमा हप्ता भरण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. हा खर्च जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरून करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याबरोबरच चाचणी व लसीकरणासाठी ही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करता येणार आहे.