-----------------
फजलापूर येथे माती परीक्षणाचे धडेब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील फजलापूर शिवारात अकोला जिल्ह्यातील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी माहोरे हिने माती परीक्षणाचे धडे दिले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
----------------
दहिगाव रेचा येथे वाचनालयाच्या इमारतीचे लोकार्पण
फोटो बातमी पान २ संक्षिप्त
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथे ' क' दर्जा प्राप्त असलेल्या ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थानिक शाखेने १९७९ मध्ये या वाचनालयाची स्थापना केली. याप्रसंगी ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, भुजंगराव शेरकर, गजानन काळमेघ, शालिकराम गिते, गणेश सावरकर, संजय रेचे, अशोक चरपे, रमेश रेचे, संजय भगत, सरपंच सुनंदा खेडकर, उपसरपंच विशाल इंगले, उदय साबळे, उद्धव गिते, निवृत्ती सावरकर आदी उपस्थित होते.
------------
युवकाच्या डोक्यावर चाकुहल्ला
तिवसा : जुन्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने युवकाच्या डोक्यावर चाकुहल्ला चढविण्यात आला. ही घटना येथील पंचवटी चौकात १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान घडली. युवतीच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी अजय रमेश सावंत (२८), गुंफाबाई रमेश सावंत (५०, रा. माळेगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
क्षुल्लक वादातून कैचीने वार
तिवसा : भाजीपाल्याची हातगाडी फुलविक्रेत्याच्या दुकानासमोर लावल्यावरून झालेला वाद मिटविण्यास गेलेल्या युवकावर कैचीने वार केल्याची घटना जुनी नगर पंचायत बाजार चौकात १३ एप्रिल रोजी घडली. हर्षल कैलास वानखडे (१६) याच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी आकाश दशरथ बडवाई (२६), विशाल दशरथ बडवाई (२३) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
युवकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण
माहुली : दोन युवकांमध्ये वाद होत असल्याचा गैरसमज करून तिसऱ्याने कु-हाडीच्या दांड्याने युवकावर वार केला. ही घटना नांदुरा पिंगळाई येथे १२ एप्रिल रोजी घडली. सुनील मनीष भोसले (१९) याच्या तक्रारीवरून माहुली पोलिसांनी अपिकेत अनिष घोसले (२०) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------
रतीसह ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी रस्त्यावरून रेती चोरून नेताना ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४.५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई १३ एप्रिल रोजी मध्यरात्री ३.३० वाजता मोर्शी पोलिसांनी केली. विठ्ठल अण्णाजी राऊत, अजय अंबादास बायस्करविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
--------------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
शेंदूरजनाघाट : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत १६ वर्ष ७ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना १० एप्रिल रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------