मागणी : आम आदमी पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : स्थानिक विलासनगर परीसरातील झोपडपट्टीला बुधवारी रात्री लागलेल्या आगित नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रूपये देण्यात यावे. याशिवाय न्यू बजरंगनगर, मांडवा झोपडपट्टीतील नागरिकांना याच ठिकाणी कायमस्वरूपी करून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.मागील २०-२५ वर्षापासून ७०० घरांची लोकवस्ती असणारे कुटुंबे न्यू बजरंग नगर, मांडवा झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. तेथील स्थानिक नागरिक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करत आहेत. ३० डिसेंबर रोजी लागलेल्या आगीने अनेक घरे जळून खाक झाली. या घटनेत नागरिकांचे लाखो रूपयाचे साहित्य जळल्याने ही सर्व कुटंूब उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० ते १२ हजारांची मदत दिली आहे. मात्र ही मदत अल्पशी असल्याने नुकसानाचे तुलनेत काहीच नाही. या कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाने किमान एक लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, झोपडपट्टीतील रहिवासाचे वास्तव्य याच ठिकाणी कायम करावे व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेनाव्दारे केली आहे. निवेदन देतेवेळी आपचे नितीन उजगावकर, अलिम पटेल, संजय पांडव, रंजना मामर्डे, किरण गुडधे, रोशन अर्डक, सुधीर तायडे, राहूल चव्हाण, सुधिर इंगळे, शरद इंगळे, सिध्दार्थ इंगळे, मंगेश वानखडे, पुरूपोत्तम गायकवाड, मेघा इंगोले, आम्रपाली इंगोले, रेखा मोरे, कमला डोंगरे व अन्य महिला उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रूपये भरपाई द्या
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM