बडनेरा : स्थानिक प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थिनींची इंग्लंड येथे शांती राजदूत म्हणून निवड झालेली आहे. लीला पूनावाला फाउंडेशनच्या या उपक्रमात त्यांना तीन आठवडे तेथे वास्तव्याची संधी मिळणार आहे. विद्युत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या समृद्धी जोशी व मयुरी पोकळे यांची इंग्लंड येथे शांती राजदूत म्हणून निवड झालेली आहे. त्या इंग्लंडमध्ये १२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर अशा कालवधीत राहतील. त्यांच्यासह महाराष्ट्रातून २४ विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. स्त्रीवर्गातील युवा नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, आपल्या या गुणांचा विकास करून आपण ज्या समाजात राहतो, त्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने त्यांंची जडणघडण व्हावी, हा दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी तसेच कार्यकारी सदस्य शंकरराव काळे, नितीन हिवसे, वृषाली धांडे, रागिणी धांडे, पूनम चौधरी, प्राचार्य एम.एस. अली, विभागप्रमुख अमित मोहोड, लीला पूनावाला फाऊंडेशनच्या समन्वयक सुप्रिया बेजलवार यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
मेघे अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनी शांती राजदूत, लीला पूनावाला फाऊंडेशनचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 5:50 PM