अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बरीच नागरिकांची बैठकीला उपस्थिती होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही बाब जाणून घेऊन उपस्थित नागरिकांचे शब्द सुमनांनी कौतुक करण्यात आले. उपस्थित अधिकारी यांनी शासनाची व प्रशासनाची सण व उत्सवांवर कोणत्याही प्रकारचे बंधने लादण्याची इच्छा नसून येणाऱ्या कोविड १९च्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मिरवणुका जमावबंदीवर निर्बंध घातल्याचे सांगितले. नगराध्यक्षांनी शहरात गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांना दिली व सर्व गणेश मंडळांनी नगरपरिषदेने बनवलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले.
बैठकीला अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय अधिकारी महाजन, तहसीलदार अभिजित जगताप, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, महावितरण उपअभियंता संदीप गुजर, अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर तसेच शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर पोलीसपाटील, पत्रकार, राजकीय पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट यांनी केले तर बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांनी आभार मानल्यानंतर बैठकीची सांगता झाली.