ठाणेदार मगन मेहते यांनी केले आवाहन
चांदूर रेल्वे : आगामी पोळा, गणेशोत्सव सणानिमित्त पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जातीय सलोखा कायम राहावा, याकरिता चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक रविवारी सायंकाळी ६ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार मगन मेहते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पोळा सण घरीच साजरा करावा. सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट तसेच घरगुती गणेशमूर्ती दोन फूटपेक्षा मोठी असू नये. डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करू नये तसेच इतर महत्त्वाच्या सूचना ठाणेदार मगन मेहते यांनी दिल्या. बैठकीला नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, सैय्यद जाकीर, सतीश देशमुख, युसूफ खान, रवींद्र मेंढे, बाळासाहेब सोरगिवकर, जहिरोद्दीन काझी, इरफान पठाण, नुरुलहसन कुरेशी, अनिस सौदागर, शेख अनिस (पहिलवान), नीलेश गुल्हाने, नितीन गवळी, राजकुमार जालान, प्रशांत माकोडे, सुरेश मेश्राम, हर्षल वाघ, गजानन ठाकरे, महेश राऊत, राजीव अंबापुरे, विलास तांडेकर, चेतन भोले, महेश कलावटे, प्रसन्ना पाटील, केशव वंजारी, अभिजित तिवारी, प्रभाकरराव भगोले, बच्चू वानरे, देवशंकर विश्वकर्मा, गजानन यादव, नरेंद्र बांडबैल, बंडू आठवले, खुपिया अरुण भुरकाडे, कॉन्स्टेबल वानखडे आदींची उपस्थिती होती.
060921\img-20210906-wa0006.jpg
photo